ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - मुंबई कोरोना व्हायरस

इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोना वर मात करत आहेत. देशभरात सध्या 3,59,506 अ‌ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1,86,934 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाशी झुंज देताना 11,903 जणांना जीव गमवावा लागला आहे.

covid-19-news-from-across-the-nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 18, 2020, 6:08 AM IST

हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. मात्र, यात एक दिलासादायक बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोना वर मात करत आहेत. देशभरात सध्या 3,59,506 अ‌ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1,86,934 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाशी झुंज देताना 11,903 जणांना जीव गमवावा लागला आहे.

covid-19-news-from-across-the-nation
देशभरातील कोरोनाची आकडेवारी

दिल्ली

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बुधवारी त्यांची परत कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. जैन सध्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

दरम्यान, दिल्ली सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी हे जिल्ह्यांमध्ये कोरोनाशी संबंधित प्रत्येक निर्णय घेतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

केरळ

जे नागरिक केरळचे नाहीत (NRK) मात्र, केरळमध्ये राहतात, त्यांना परत केरळमध्ये येण्यासाठी कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक

कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (केआयएमएस) एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. या यशस्वी थेरपीनंतर बुधवारी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी राज्यात आठ नवीन मृत्यू झाले आहेत. यासह मृत्यूचा एकूण आकडा 100 च्या वर गेला आहे. तर 204 नवीन रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा 7,734 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र

बुधवारी मुंबईत कोरोनाव्हायरसमुळे तब्बल 7 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. बीएमसीकडे 1500 रक्षक आहेत. त्यातील 114 जणांना कोरोची लागण झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात 1024 बेड असलेल्या 10 मजली रुग्णालयाचे ई-उद्घाटन करण्यात आले.

तामिळनाडू

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के.पालानिस्वामी यांचे खासगी सचिव बी.जे दामोधरन यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले.दामोधरन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असे पलानीस्वामी यांनी सांगितले आहे.

राजस्थान

राजस्थानचा कोटा जिल्हा अडीच महिन्यांपासून रेड झोनमध्ये होता. परंतु आता स्थानिक प्रशासनाने थ्री-लेयर ट्रॅकिंग सिस्टमचा उपयोग करुन त्याची वर्णी आ‌ॅरेंज झानमध्ये केली आहे. जिल्ह्यात आता फक्त एक सक्रिय रुग्ण बाकी आहे. बुधवारी जिल्ह्यातून एकही नवा रुग्ण आढळला नाही.

उत्तर प्रदेश

प्रयागराजमध्ये 18व्या बटालियनचे आणखी पाच आयटीबीपी जवान कोरोनाबाधित आढळले आहेत. हे बटालियन दिल्लीत कर्तव्यावर होते त्यांनतर 9 जून रोजी प्रयागराज परत आले होते. आता बटालियनमधील एकूण रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या बुधवारी 14,724 वर पोहोचली. बुधवारी सकाळपर्यंत आग्रामध्ये तीन मृत्यू आणि 18 नवीन रुग्णांची वाढ झाली. तर एकूण 545 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंड

बुधवारी राज्यात 43 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या आकडेवारीसह, राज्यात कोरोनाचा एकूण आकडा 1985 वर गेला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, 1230 रुग्ण बरे झाले असून 755 रुग्ण अ‌ॅक्टीव्ह आहेत. राज्यात आतापर्यंत 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ओडिशा

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोविड केअर होम सुविधा सुरू केली जाणार आहे. ज्यामध्ये एकावेळी १० ते २० जणांना राहता येणार असल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सांगितले आहे.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशात बुधवारी दहा नवीन रुग्ण आढळून आले. त्यात बुधवारी उना जिल्ह्यातील चार, चंबा जिल्ह्यातील तीन, सोलन जिल्ह्यातील दोन आणि कांगडा जिल्ह्यातील एक रुग्णांचा समावेश आहे.राज्यात चंबा येथील तीन आणि मंडई येथील एका रुग्णांने बुधवारी कोरोनावर मात केली. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 570 वर पाहोचली आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेश

ऊर्जा विभागातील अटॅचमेंट कन्सल्टन्सीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मंत्रालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. आतापर्यंत येथे तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचार्‍यांपैकी एकाचा मृत्यूही झाला आहे.

बिहार

देशभरातून दररोज हजारो स्थलांतरीत कामगार बिहारमधील आपल्या जिल्ह्यात परत येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मॉल, भाजीपाला बाजार, मासे बाजार आणि ग्रामीण बाजारपेठांसह गर्दीच्या ठिकाणी रॅन्डम चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात

मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी गांधीनगरमधील मुख्यमंत्री कार्यालयाच्या आवारात प्रवेश करताना मास्क न घातल्याबद्दल गुजरातचे मंत्री ईश्वरसिंह पटेल यांना बुधवारी 200 रुपये दंड भरावा लागला.कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घराबाहे मास्क घालणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत राज्यात 1,534 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

झारखंड

बुधवारी कोरोनामुळे एका 25 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यासह राज्यात कोरोनाव्हायरसच्या मृत्यूची संख्या 10 झाली आहे. तर 30 जणांना बुधवारी कोरोनाची लागण झाली आहे. यासह एकूण बाधितांचा आकडा 1,793 वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.