हैदराबाद - देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, एक दिलासादायक माहिती समाेर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल १३,९२५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर ५५.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाती कोरोना चाचणीचा दरही वाढला असून, गेल्या २४ तासांमध्ये १,९०,७३० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यानंतर, देशातील एकूण कोरोना चाचणी झालेल्या लोकांची संख्या ६८,०७,२२६वर पोहोचली आहे.
रविवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक (१५,४१३) कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांच्या वर (४,१०४६१) पोहोचली आहे. यामध्ये १,६९,४५१ रुग्ण अॅक्टिव असून, २,२७,७५६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर आतापर्यंत १३,२५४ रुग्णांचा बळी गेला आहे.
हेही वाचा : तेलंगाणाचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही. हनुमंत राव 'कोरोना पॉझिटिव्ह'