ETV Bharat / bharat

देश कोरोनातून सावरतोय..! रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर; अ‌ॅक्टिव्ह रुग्ण ७ लाखांच्या खाली - भारत कोरोना मृत्यू दर

मागील २४ तासात देशात ६२ हजार ७७ जणांना बरे झाल्यानंर रुग्णालयातून 'डिस्चार्ज' देण्यात आला आहे. तर ५० हजार १२९ नवे रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात दिवसाला ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. मात्र, आता नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 25, 2020, 3:48 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला यश येताना दिसत आहे. आज (रविवारी) देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. मागील २४ तासात देशात ६२ हजार ७७ जणांना उपचारानंतर 'डिस्चार्ज' देण्यात आला आहे. तर ५० हजार १२९ नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी देशात दिवसाला ९० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत होती. मात्र, आता नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

अ‌ॅक्टिव्ह रुग्ण ७ लाखांच्या खाली

देशातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी आता फक्त ८.५० टक्के रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. सद्य स्थितीत ६ लाख ६८ हजार १५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

COVID
रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर

२ ऑक्टोबरपासून देशात १ हजार १०० पेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ७५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्यातील दरीही वाढत असून हे चांगले संकेत आहेत. मागील एका आठवड्यापासून देशात सलग १ हजारांपेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. २ ऑक्टोबरपासून देशात १ हजार १०० पेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संसर्गातून बरे झालेल्यांपैकी ७५ टक्के रुग्ण दहा राज्यांतील

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांपैकी ७५ टक्के रुग्ण हे १० केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांतील आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगडमधील रुग्णांचा समावेश आहे. यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. एकाच दिवसात महाराष्ट्रात १० हजारापेक्षा जास्त व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

केरळमध्ये देशात सर्वात जास्त नवे रुग्ण

देशात जे नवे रुग्ण सापडत आहेत, त्यातील ७९ टक्के रुग्ण हे १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडत आहेत. दरदिवशी ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण केरळात आणि ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. मागील २४ तासांत देशात ५७८ रुग्ण दगावले आहेत. तर महाराष्ट्रात १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.