ETV Bharat / bharat

COVID-19 updates : देशभरातील कोरोनासंबंधी सर्व बातम्या; वाचा एका क्लिकवर..

COVID-19 India updates LIVE
Corona updates LIVE : देशभरातील कोरोनासंबंधी सर्व बातम्या; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 3, 2020, 11:46 AM IST

Updated : May 3, 2020, 8:25 PM IST

20:17 May 03

केवळ मूळ निवासी कामगारांनाच आपल्या राज्यांमध्ये परत जाता येईल; गृहमंत्रालाने केले स्पष्ट

नवी दिल्ली - केवळ एखाद्या राज्यातील मूळ निवासी दुसऱ्या राज्यांमध्ये अडकले असतील, तर त्यांनाच घरी जाण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. कामानिमित्त ज्यांना दुसऱ्या राज्यात जायचे आहे, अशा लोकांना श्रमिक विशेष रेल्वेमधून प्रवास करता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज हे स्पष्ट केले आहे.

20:14 May 03

मध्यप्रदेश सीमेवर स्थलांतरित मजूरांची गर्दी; पोलिसांवर केली दगडफेक..

भोपाळ - लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मात्र, नुकत्याच जारी झालेल्या केंद्र सरकारच्या नियमावलीमुळे कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी धडपडत आहेत. अशातच मध्यप्रदेश सीमेवर अनेक स्थलांतरित कामगार जमा झाले आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेशासह इतरही राज्यातील मजुरांचे लोंढे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर जमा होत आहेत.

सविस्तर वाचा : महाराष्ट्रातून आलेल्या स्थलांतरित मजूरांची मध्यप्रदेश सीमेवर गर्दी; पोलिसांवर दगडफेक

19:37 May 03

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांवर..

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (रविवार) ४० हजारांच्या पुढे गेला आहे. यातील २८ हजार ७० केसेस पॉझिटिव्ह असून १० हजार ८८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. १ हजार ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा : देशात ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; मागील २४ तासांत २ हजार ४८७ रुग्णांची नोंद

19:18 May 03

तामिळनाडूमधील रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा..

चेन्नई - तामिळनाडूमधील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. आज सायंकाळपर्यंत राज्यात कोरोनाचे एकूण ३,०२३ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी १,६११ हे अ‌ॅक्टिव रुग्ण असून, आतापर्यंत राज्यात एकूण १,३७९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

17:23 May 03

बेंगाली मार्केट परीसर कन्टेन्मेंट झोनमधून बाहेर..

नवी दिल्ली - कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या बेंगाली मार्केट परिसरामध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे हा एरिया आता कन्टेन्मेंट झोन म्हणून राहणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. उद्यापासून या भागातील निर्बंधांमध्ये शिथिलता लागू केली जाईल. 

17:20 May 03

लॉकडाऊन : चिमुकलीच्या वाढदिवसाला चक्क पोलीस अधिक्षक पोहोचले केक घेऊन..

जयपूर - सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. अशातही वेळ काळत पोलिसांनी एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा करत नागरिकांची मने जिंकली.

सविस्तर वाचा : खाकीतली माणुसकी... चिमुकलीचा पहिला वाढदिवस पोलिसांनी केला अविस्मरणीय

17:20 May 03

मध्यप्रदेशमध्ये विस्थापित मजूरांनी केला रास्तारोको; पोलिसांवरही केली दगडफेक..

भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांनी आज बारवानीमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर रास्तारोको केला.यावेळी त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. पोलिसांनी मजूरांशी चर्चा करुन, महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यामध्ये तीन पोलिसांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी दिली.

17:20 May 03

केरळमध्ये आज दिवसभरात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही..

तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये आज दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच, आतापर्यंत राज्यात ४०१ रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. यामुळे राज्यातील अ‌ॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ ९५ वर आली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

16:51 May 03

नौदलाने दिली अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना अनोखी मानवंदना; मानवी साखळी तयार करत मानले आभार..

COVID-19 India updates LIVE
नौदलाने दिली अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना अनोखी मानवंदना; मानवी साखळी तयार करत मानले आभार..

नवी दिल्ली - भारतीय नौदलाने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कोरोना योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. आयएनएस विक्रमादित्य या विमाने नेणाऱ्या भव्य जहाजावर मानवी साखळी तयार करत, या जवानांनी वैद्यकीय अधिकारी आणि इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्याचे आभार मानले आहेत.

16:08 May 03

घरी निघालेले विस्थापित मजूर पुन्हा झाले क्वारंटाईन..

जालौन (उत्तर प्रदेश) - केंद्र सरकारने काही अटींसह लोक डाऊन शिथिल करत या सर्व मजूर आणि कामगारांना आपापल्या राज्यात घरी जाण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, अनेक कामगार वाहनांसह स्वगृही जाण्यास निघाले आहेत. या वाहनांना झाशी-कानपूर महामार्गावर जालौन जिल्हा प्रशासनाने रोखले आहे. यांना जिल्ह्याची सीमा पार करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महामार्गावर या सर्व मजुरांची शेकडोंच्या संख्येने वाहने थांबली असून येथे चक्काजामसारखी स्थिती झाली आहे.

सविस्तर वाचा : जालौन प्रशासनने सीमेवर रोखली मजुरांची वाहने, महामार्गावर लांबच लांब रांगा

16:07 May 03

पोलिसांने केला महिलेचा विनयभंग; क्वारंटाईन सेंटरमधील धक्कादायक प्रकार..

नवी दिल्ली - गुरुग्राम सेक्टर येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एका कोरोना संशयित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही पोलीस नशेत होते, असे पीडित महिलेने म्हटले आहे. शहरातील पॉलीक्लिनिक येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ही घटना घडली.

सविस्तर वाचा : क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा वियनभंग

16:06 May 03

रांचीमध्ये लष्कराच्या जणांना केले क्वारंटाईन..

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. रांचीमध्ये आज तब्बल 228 जवान आणि 111 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 228 जवान आणि 111 एएसआय ते इंस्पेक्टर स्तरावरील कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. हिंदपीरीमध्ये वेगवेगळ्या भागात तैनात असलेल्या या सैनिकांनी शनिवारी रात्रीपर्यंत 14 दिवसांची ड्युटी पूर्ण केली असून त्यानंतर आता त्यांना अलग ठेवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा : रांचीमध्ये 228 जवान अन् 111 पोलीस कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन

16:04 May 03

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दलाई लामांचा जगाला संदेश..

शिमला - संपूर्ण जग कोरोना महामाराची सामना करत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी एकत्र व्हा, असे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी जगभरातली नागरिकांना आवाहन केले आहे. धरमशाल येथून त्यांनी जगासाठी आपला संदेश जारी केला आहे.

सविस्तर वाचा : 'कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज'

16:03 May 03

कर्नाटकातील सुमारे एक हजार मजूर भुवनेश्वरला रवाना..

बंगळुरू (कर्नाटक)- लॉकडाऊन काळात स्थलांतरित श्रमिकांना बस आणि ट्रेनच्या सहायाने त्यांच्या राज्यात पोहचविण्याची मुभा गृहमंत्रालयाने दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंगळुरू-भूवनेश्वर विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी या ट्रेनने १ हजार १९० श्रमिकांना भूवनेश्वरला पाठविण्यात आले आहे.

सविस्तर वाचा : बंगळुरूहून १ हजार १६० मजुरांना घेऊन भूवनेश्वरच्या दिशेने विशेष श्रमिक ट्रेन रवाना

16:02 May 03

गुजरातमधील स्थलांतरीत मजुरांची पोलिसांवर दगडफेक..

गांधीनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन आणखी दोन आठवडे केंद्र सरकारने वाढवले आहे. लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांचा धीर सुटत आहे. त्यामुळे ते जीवाची पर्वा न करता घरी जाण्याचा पर्यंत्न करीत आहेत. अशाच प्रकारे घरी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. गुजरातमधील दोहोड जिल्ह्यातील खंगेलात ही घटना घडली. या घटनेत पोलिसांना इजा झाली नाही. मात्र, पोलिसांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा : मजुरांची पोलिसांवर दगडफेक... गुजरातच्या दोहोडमधील प्रकार

15:49 May 03

महाराष्ट्रात आता रेड झोनमध्येही मिळणार दारू; दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी..

मुंबई - राज्यात 'रेड झोन'मध्येही स्वतंत्र दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. कंटेन्मेन्ट झोन वगळता बाकी सर्व ठिकाणी ही दुकाने सशर्त सुरू ठेवण्यात येतील. यासोबतच, एका लेनमध्ये अत्यावश्यक नसलेली केवळ पाच दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांसाठी ही अट नसणार आहे.

15:02 May 03

नांदेडहून पंजाबला गेलेले आणखी १०५ भाविक निघाले कोरोना पॉझिटिव्ह..

चंदीगड - नांदेडहून पंजाबला परत गेलेल्या भाविकांपैकी आणखी १०५ भाविक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबच्या नवानशहरमध्ये परतलेल्या १३० नागरिकांपैकी ६३ नागरिकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब येथील ४२ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वदेखील नांदेडहून पंजाबला परतले होते.

14:57 May 03

अमृतसरमध्ये अडकलेले स्थलांतरीत कामगार काश्मीरला रवाना..

चंदीगड - पंजाबमध्ये अडकलेल्या ३७२ काश्मिरी कामगारांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवण्यात आले आहे. अमृतसरहून या कामगारांना सात विशेष बसगाड्यांमधून काश्मीरला पाठवण्यात आले. यापूर्वी त्यांची स्क्रीनिंगही करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

14:48 May 03

पश्चिम बंगालमधील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार दहा लाखांचा विमा..

कोलकाता - पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दहा लाखांचा विमा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यात वैद्यकीय, पोलीस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पत्रकारांचाही समावेश आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत माहिती दिली.

13:24 May 03

आजपर्यंत दहा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; देशात जगातील सर्वात कमी मृत्यूदर..

नवी दिल्ली - आजपर्यंत देशातील दहा हजारांहून अधिक रुग्णांवरील उपचार यशस्वी झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. यासोबतच, जगातील सर्वात कमी मृत्यूदर (३.२ टक्के) भारतात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

12:41 May 03

आंध्र प्रदेशमध्ये ५८ नव्या रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या झाली १,५८३

अमरावती - आंध्र प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ५८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,५८३वर पोहोचली आहे. यांमध्ये १,०६२ अ‌ॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे, तर आतापर्यंत ४८८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या ३३ आहे.

12:04 May 03

कर्नाटकात कालपासून पाच नव्या रुग्णांची नोंद; एकही नवा बळी नाही..

बंगळुरू - गेल्या १८ तासांमध्ये कर्नाटकात पाच नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६०६ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाच्या एकाही बळीची नोंद झाली नाही. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या २५ आहे. तसेच आतापर्यंत २८२ लोकांवरील उपचार यशस्वी झाले आहेत.

11:56 May 03

सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; दिल्लीमधील मुख्यालय केले सील..

नवी दिल्ली - सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीमधील सीआरपीएफचे मुख्यालय हे निर्जंतुकीकरणासाठी सील करण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे मुख्यालय बंदच ठेवण्यात येणार असून, या इमारतीमध्ये जाण्याची कोणालाही परवानगी मिळणार नाही.

11:43 May 03

कोटामध्ये अडकलेले झारखंडचे विद्यार्थी पोहोचले घरी..

रांची (झारखंड)- कोरोनामुळे देशातील बरेच विद्यार्थी राजस्थानच्या कोटा या शहरात अडकले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी विविध राज्यांकडून प्रयत्न केले जात आहे. राज्यातील १ हाजार २०० विद्यार्थी देखील कोटा येथे अडकले होते. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेनने राज्यात वापस आणण्यात आले आहे. ही ट्रेन काल रात्री ७ च्या सुमारास राचीच्या हतिया रेल्वे स्थानकावर पोहोचली होती, अशी माहिती राचीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज अम्बस्त यांनी सांगितले.

सविस्तर वाचा : कोविड-१९: कोटा येथे अडकलेल्या झारखंडमधील विद्यार्थ्यांची विशेष रेल्वेने घरवापसी

11:38 May 03

आतापर्यंत देशातील दहा लाखांहून अधिक नागरिकांची झाली कोरोना चाचणी..

नवी दिल्ली - देशात आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने रविवारी ही आकडेवारी जाहीर केली. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण १०,४६,४५० नमुन्यांची तपासणी केल्याचे या अहवालात सांगितले आहे.

09:29 May 03

देशात कोरोनाचे सुमारे ४० हजार रुग्ण; १ हजार ३०१ जणांचा बळी..

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ३९ हजार ९८० झाली असून यातील २८ हजार ०४६ अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आत्तापर्यंत १० हजार ६३३ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. देशभरामध्ये १ हजार ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

वाचा सविस्तर आकडेवारी : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या जवळ; १ हजार ३०१ दगावले

Last Updated : May 3, 2020, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.