ETV Bharat / bharat

COVID-19 : देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर... - covid-19 case count in india

देशात 3 लाख 8 हजार 993 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jun 13, 2020, 1:28 PM IST

नवी दिल्ली - देशात गेल्या २४ तासांमध्ये पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांजवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 11 हजार 458 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 386 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 3 लाख 8 हजार 993 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 45 हजार 779 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत, तर 1 लाख 54 हजार 330 जण बरे झाले आहेत. तसेच 8 हजार 884 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 3 हजार 717 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 1 हजार 141 वर गेली आहे. यातील एकूण 49 हजार 628 केसेस अ‌ॅक्टिव्ह आहेत.

नवी दिल्लीमध्ये 36 हजार 824 कोरोनाबाधित आहेत, तर 1 हजार 214 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 22 हजार 212 रुग्ण सक्रिय आहेत. तर 13 हजार 398 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुजरातमध्ये 22 हजार 527 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 1 हजार 415 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 15 हजार 493 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 5 हजार 619 रुग्ण सक्रिय आहेत.

तामिळनाडूमध्ये 40 हजार 698 कोरोनाबाधित, तर 367 जणांचा बळी गेला आहे. तसेच 22 हजार 47 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 18 हजार 84 जणांवर उपचार सुरू आहेत.

अंदमान- निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझारोम, नागालँड, सिक्किम आणि दमन आणि दिव, दादरा आणि नगर हवेली येथे एकही कोरोनाबाधिताचा अद्याप मृत्यू झालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.