नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 56 हजार 611 एवढा झाला आहे, यात 1 लाख 25 हजार 381 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर 1 लाख 24 हजार 95 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 7 हजार 135 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 85 हजार 975 कोरोनाबाधित असून 3 हजार 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 31 हजार 667 कोरोनाबाधित तर 269 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 20 हजार 70 कोरोनाबाधित असून 1 हजार 249 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 27 हजार 654 कोरोनाबाधित तर 761 जणांचा मृत्यू झाला आहे.
कधी संपते कोरोना साखळी - एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसांत एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.