नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण 35 हजार 43 रुग्ण आढळले असून, यांपैकी 25 हजार 7 अॅक्टिव्ह केस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 8 हजार 889 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, 1 हजार 147 जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये 10 हजार 498 कोरोनाबाधित असून 459 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 395 कोरोनाबाधित आढळले असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे.
कधी संपते कोरोना साखळी -
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.