ETV Bharat / bharat

COVID-19 : देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..

देशभरात एकूण 12 हजार 380 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, यांपैकी 10 हजार 477 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 1 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, 414 जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

COVID-19 India tracker: State-wise report

author img

By

Published : Apr 16, 2020, 11:32 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण 12 हजार 380 रुग्ण आढळले असून, यांपैकी 10 हजार 477 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 1 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, 414 जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

COVID-19 India tracker: State-wise report
COVID-19 : देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, पहा एका क्लिकवर..

महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 हजार 916 कोरोनाबाधित असून 187 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 242 कोरोनाबाधित असून 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 1 हजार 578 कोरोनाबाधित तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राजस्थानमध्ये 1 हजार 23 कोरोनाबाधित आहेत, तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान जगभरातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 83 हजार 304 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत जगभरात तब्बल 1 लाख 34 हजार 616 नागरिक दगावले आहेत. अशा कठीण परिस्थितीतही दिलासादायक बातमी म्हणजे, 5 लाख 10 हजार 350 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

कधी संपते कोरोना साखळी -

एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.