ETV Bharat / bharat

देशातील रुग्णांची संख्या ५,७३४; आतापर्यंत १६६ बळी, तर ४७२ लोकांना डिस्चार्ज..

author img

By

Published : Apr 9, 2020, 10:40 AM IST

देशातील एकूण रुग्णांपैकी ५,०९५ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ४७३ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

COVID-19 India tracker: State-wise report
देशातील रुग्णांची संख्या ५,७३४; आतापर्यंत १६६ बळी, तर ४७२ लोकांना डिस्चार्ज..

नवी दिल्ली - देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५४० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५,७३४ झाली आहे.

देशातील एकूण रुग्णांपैकी ५,०९५ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ४७३ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या १७ नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १६६ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

COVID-19 India tracker: State-wise report
कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी..

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (१,१३५) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळानाडू (७३८) आणि दिल्लीचा (६६९) क्रमांक लागतो. तर सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रातच (७५) गेले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (१६) आणि मध्य प्रदेशचा (१३) क्रमांक लागतो.

हेही वाचा : घरातून पळून गेले प्रेमी जोडपे; लॉकडाऊनचा आदेश मोडल्यामुळे गुन्हा दाखल..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.