केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जवळपास २६७ लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक (६३५) रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर तामिळनाडू (४८५), दिल्ली (४४५), आणि केरळचा क्रमांक लागतो. देशात सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रात (३२) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (१०) आणि तेलंगाणाचा (७) क्रमांक लागतो.
हेही वाचा : 'टाळी वाजवून अन् दिवे लावून समस्या सुटणार नाही'