नवी दिल्ली - कोविड-19 मुळे आम्हाला द्वितीय विश्वयुद्धाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी मिळाली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तिसर्या वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमीच्या सभेत ते बोलत होते. द्वितीय विश्वयुद्धानंतर जगाने नवीन जागतिक व्यवस्था स्विकारत स्वतःला बदलले. कोविड -19 नेही आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची एक समान संधी दिली आहे. आपल्याला या संधीचा फायदा घेत भविष्याची रूपरेषा आखावी लागेल, असेही ते म्हणाले.
सामुदायिक मेळावे, क्रीडा उपक्रम, शिक्षण तसेच इतर कार्यक्रम पूर्वीसारखे होत नसून ते पुन्हा सुरू कसे करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ऐतिहासिक पुनर्बांधणीच्या प्रयत्नांमधून आपल्याला अनेक धडे मिळू शकतात. तसेच लॉकडाउन दरम्यान, अनेक शहरांमध्ये स्वच्छ तलाव, नद्या आणि हवा दिसू लागली आहे. आपल्यापैकी बरेचजण पक्ष्यांच्या किलबीलाटांचे आवाज ऐकू शकत असतील, जे आपल्याला पूर्वी ऐकायला मिळत नव्हते. तसेच जागतिक अर्थव्यवस्था आज ज्या संकटाचा सामना करत आहे. त्यावर कृतीशील तोडगा काढण्यासाठी ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या माध्यमातून एक समुदाय तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा- कोरोना नियमांचे पालन करत बाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती