ETV Bharat / bharat

COVID-19: विदेशात अडकलेल्या मुलांच्या कुटुंबीयांशी ईटीव्ही भारतने साधला संवाद

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील बरेच लोक परदेशात अडकले आहेत. ईटीव्ही भारत यांनी जिल्ह्यातील अशा दोन कुटुंबांशी संवाद साधला.

author img

By

Published : Apr 20, 2020, 2:45 PM IST

Families of Indians stranded abroad suffer a long wait
COVID-19: विदेशात अडकलेल्या मुलांच्या कुटुंबीयांशी ईटीव्ही भारतने साधला संवाद

किन्नौर (हिमाचल प्रदेश) - जगातील बहुतेक देशांमध्ये सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अशात भारतात परतण्याच्या विचारात असलेले बरेच जण आता परदेशात अडकले आहेत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील बरेच लोक परदेशात अडकले आहेत.

ईटीव्ही भारत यांनी जिल्ह्यातील अशा दोन कुटुंबांशी संवाद साधला. ज्यांची मुले सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अडकली आहेत.

रेकाँग पिओ येथील अवंतिका नेगी सध्या मेलबर्नमध्ये अडकली आहे. ती एका बिझनस कोर्ससाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. व्हिडीओ कॉलवर बोलताना अवंतिकाने सांगितले, की या महिन्यात परतण्याची तिची योजना आहे. मात्र, सध्याची परिस्थिती बघता तिला मेलबर्नमध्येच थांबावे लागेल.

अवंतिकाचे वडील नागेश सांगतात, की ते आपल्या मुलीशी दररोज व्हिडिओ कॉलद्वारे बोलतात आणि घरीच राहण्याचा सल्ला देतात जेणेकरुन ती सुरक्षित राहू शकेल.

ख्वांगी गावचा निट्टू नेगीदेखील ऑस्ट्रेलियामध्ये अडकला आहे. निट्टू हा सध्या सिडनीत हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधीत आहे.

निट्टूचा मोठा भाऊ शांती नेगी यांनी सांगितले की, जूनमध्ये तो भारतात परतणार होता आणि त्याने कुटुंबींयाना ऑस्ट्रेलियात नेण्याचे ठरवले होते. मात्र, आताची परिस्थिती बघता तो येऊ शकणार नाही. त्यामुळे आम्ही त्याला घरातच राहण्याचा सल्ला देतो.

अवंतिका आणि नितू या दोघांनाही ऑस्ट्रेलियामध्ये सुविधांची कमतरता नसली तरी ते अद्याप हिमाचल प्रदेशातील आपल्या कुटुंबीयापासून दूर आहेत. त्यांना भारतात परतण्यासाठी हा रोग संपण्याची वाट बघावी लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.