ETV Bharat / bharat

देशभरात आढळले 37 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्येने गाठला 11 लाखांचा टप्पा

गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये एका दिवसात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 40 हजारांच्या घरात गेली आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेतल्या तर कोविड १९ विषाणूचा प्रसार होणार नाही, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

corona update
देशभरात आढळले 37 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्येने गाठला 11 लाखांचा टप्पा
author img

By

Published : Jul 21, 2020, 9:59 AM IST

नवी दिल्ली - गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 37 हजार 148 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गंभिर बाब म्हणजे एकाच दिवसात 587 जणांना जीव गमावावा लागला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजार 191 झालू आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 2 हजार 529 आहे तर समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत 7 लाख 24 हजार 578 कोरोाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी देशामध्ये एकूण 3 लाख 33 हजार कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये एका दिवसात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 40 हजारांच्या घरात गेली आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेतल्या तर कोविड १९ विषाणूचा प्रसार होणार नाही. तसे केल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा लवकर सापडेल आणि त्याला इतर निरोगी लोकांपासून बाजूला करता येईल, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू या राज्यामध्ये लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 12 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल आहे. तसेच जगभरामध्ये अमेरिका आणि ब्राझिलनंतर कोरोना रुग्णसंख्येबाबत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत देशात दीड कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती -

राज्यात सोमवारी 8240 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 18 हजार 695 अशी झाली आहे. सोमवारी नवीन 5460 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 75 हजार 29 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 31 हजार 334 सक्रिय रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.