ETV Bharat / bharat

लॉकडाऊन... आटोपले लग्न, वधू-वर मास्क घालून लग्न मंडपात - वधू-वर मास्क घालून लग्न मंडपात

लॉकडाऊनमध्येही खरगपूर येथे बंगाली पद्धतीने एक लग्नसोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थिती पार पडला आहे. जोडप्याने लॉकडाऊनमध्ये गरजूंमध्ये अन्न वाटप करणार्‍या संस्थेला 31,000 रुपयांचा निधी दिला आहे.

Couple ties knot while following lockdown norms

author img

By

Published : Apr 19, 2020, 10:07 AM IST

Updated : Apr 19, 2020, 10:33 AM IST

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत बाकी सर्व बंद करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे लग्न ठरलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक जण त्रस्त झाले. यातच लॉकडाऊनमध्येही खरगपूर येथे बंगाली पद्धतीने एक लग्नसोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थिती पार पडला आहे.

आमचे लग्न 13 मार्चला होणार होते. मात्र, आई आजारी पडल्याने होऊ शकले नाही. त्यावर माझ्या सासूने त्यांच्या मुलीला माझ्या आईची काळजी घेण्यासाठी घरी पाठवले. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन लागू केल्यामुळे ती परत घरी जाऊ शकली नाही. म्हणून आम्ही लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याचे ठरवले, असे नवरदेव सौरव कर्माकर यांनी सांगितले.

पूर्व नियोजित भव्य विवाह सोहळा लॉकडाऊन असल्याने होऊ शकला नाही. लग्नखर्चासाठी ठेवलेली रक्कम लॉकडाऊनमध्ये उपासमार होत असलेल्या लोकांसाठी वापरण्याचा या जोडप्याने निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये गरजूंमध्ये अन्न वाटप करणार्‍या संस्थेला 31,000 रुपयांचा निधी दिला आहे.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश निघाले आहेत. अनेकांनी आपले लग्न दिवाळीपर्यंत लांबणीवर टाकले आहेत. कोरोनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयही बंद असल्याने रजिस्टर्ड होणारी लग्नेही बंद आहेत. कोरोनामुळे विवाह सोहळे रद्द झाल्याचा आर्थिक फटका हा वरवधू पित्यासह, भटजी, मंडप, बँडवाले, केटरर्स, घोडागाडी या व्यावसायिकांनाही बसला आहे. लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक जण त्रस्त झाले.

Last Updated : Apr 19, 2020, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.