कोलकाता - पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी बॉम्ब आढळून आले आहेत. मालदामधील माजामपूर गावातील एका पडक्या इमारतीमध्ये हे बॉम्ब मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालीयाचक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माजामपूर गावामध्ये पोलिसांना देशी बॉम्बचा साठा आढळून आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पडक्या इमारतीमध्ये, पाच बॅरल्समध्ये हे बॉम्ब साठवलेले मिळाले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
यानंतर तातडीने हा परिसर मोकळा करुन, बॉम्ब पथकाला पाचारण करण्यात आले. हे बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा : 'राजकीय भविष्याच्या चिंतेमुळे सिंधिया आपली विचारसरणी विसरले'