ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष : एक धडाडीच्या अन् विलक्षण नेत्या.. सुषमा स्वराज! - सुषमा स्वराज आदरांजली

आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतातील काही शक्तिशाली महिलांच्या कारकीर्दीवर आपण एक नजर टाकणार आहोत. देशाला लाभलेल्या काही महान महिलांची यादी, ही 'सुषमा स्वराज' या नावाशिवाय अपूर्णच राहील.. चला तर मग पाहूयात, भारताच्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री, ते चार वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास.

Countdown to Int'l Women's Day: Remembering the feisty, warm leader Sushma Swaraj
महिला दिन विशेष : एक धडाडीच्या अन् विलक्षण नेत्या.. सुषमा स्वराज!
author img

By

Published : Mar 1, 2020, 7:42 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतातील काही शक्तिशाली महिलांच्या कारकीर्दीवर आपण एक नजर टाकणार आहोत. देशाला लाभलेल्या काही महान महिलांची यादी, ही 'सुषमा स्वराज' या नावाशिवाय अपूर्णच राहील.. चला तर मग पाहूयात, भारताच्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री, ते चार वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास.

सुरुवातीचे आयुष्य..

सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ला, हरियाणामधील अंबाला जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वरिष्ठ नेते होते. सुषमा यांनी अंबालामधील एस.डी. महाविद्यालयातून संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर, पंजाब विद्यापीठातून एल.एल.बी करुन, त्यांनी १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर १३ जुलै १९७५ ला त्यांनी आपले सहकारी वकील स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला, या दाम्पत्याला बांसुरी नावाचे कन्यारत्नही प्राप्त झाले. आणीबाणीच्या काळात हे दोघेही जॉर्ज फर्नांडिस यांच्या कायदेशीर संघाचे सदस्य होते.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या 'आणिबाणी-विरोधी' आंदोलनामध्ये सहभाग घेत, सुषमा स्वराज यांनी राजकारणात प्रवेश केला.

राजकीय प्रवास..

त्यांनी आपला राजकीय प्रवास हा १९७० साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून केला होता, जी सध्या सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी शाखा आहे.. कालांतराने त्या जनता पक्षामध्ये सहभागी झाल्या.

हळूहळू पक्षातील त्यांचे महत्त्व वाढत गेले, आणि १९७७ मध्ये त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्येही मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून, वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्यांना देवीलाल यांच्या हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.

१९७९मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाच्या हरियाणा राज्य प्रमुख म्हणून निवडण्यात आले. त्या चार वर्ष या पदावर राहिल्या, आणि त्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. जिथे कालांतराने त्यांना पक्षाच्या सचिवपदी निवडण्यात आले.. त्यानंतर १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी हरियाणाच्या शिक्षणमंत्री म्हणून कामकाज पाहिले.

राज्य विधानसभेपासून संसदेपर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र खडतर होता. १९८०, १८८४ आणि १९८९ या तीनही वर्षी झालेल्या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना काँग्रेसच्या चिरंजीलाल शर्मा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

अखेर, १९९० मध्ये त्यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले, आणि त्याच्या सहा वर्षांनंतर, १९९६मध्ये, दक्षिण दिल्लीमधून निवडून येत, त्या ११व्या लोकसभेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी झाल्या.

अटल बिहारी वाजपेयींच्या भाजप सरकारमध्ये त्यांना माहिती व तंत्रज्ञान मंत्रिपद देण्यात आले होते. हे सरकार अवघे १३ दिवस टिकले, मात्र त्या अल्पशा कालावधीमध्येही, त्यांनी लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला..

१९९८ मध्ये, १३ ऑक्टोबर ते तीन डिसेंबरपर्यंत त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिल्या. त्यानंतर, लोकसभेमधील जागा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी दिल्ली विधानसभेतून राजीनामा दिला.

विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही चांगले संबंध ठेवणाऱ्या सुषमा स्वराज यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी मात्र कधीच पटले नाही.. २००४मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर आल्यानंतर, सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला स्वराज यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्या म्हणाल्या, 'जर मी संसदेमध्ये गेले, तर मला सोनिया गांधींना नेहमी आदरणीय पंतप्रधान असे संबोधित करावे लागेल, जे मला मान्य नाही. माझी देशभक्ती मला तसे करण्याची परवानगी देत नाही, आणि मीही तसे नाही केले पाहिजे..'

1999 मध्ये कर्नाटकच्या बरेली मतदारसंघातून उभारलेल्या सोनिया गांधींविरोधात, भाजपने सुषमा स्वराज यांना संधी दिली. या निवडणुकीमध्ये, तब्बल ५६ हजार मतांच्या मताधिक्याने स्वराज यांनी सोनिया गांधींचा पराभव केला होता.

२१ डिसेंबर २००९ साली, स्वराज यांना, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याजागी विरोधी पक्षनेते म्हणून नेमण्यात आले. हे पद मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला. २०१४ पर्यंत त्यांनी हे पद भूषवले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आले. यामध्ये त्यांना परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. २६ मे २०१४ ते २९ मे २०१९ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. इंदिरा गांधींनंतर परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्याच महिला.

आपल्या एकूण कारकिर्दीमध्ये त्यांनी बरीचशी राजकीय पदं भूषवली. मात्र त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून पाहिलेले काम हे विशेष प्रसिद्ध झाले. त्यांच्या आयुष्यातील ते शेवटचे पद होते म्हणून नव्हे, तर समाजमाध्यमांचा क्रांतिकारी वापर करून त्यांनी आपल्या कामाची एक विशेष छाप सोडली.

केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांनीच नव्हे, तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही वेळोवेळी स्वराज यांचे कौतुक केले. अशा या महान व्यक्तिमत्त्वाने, ७ ऑगस्ट २०१९ला या जगाचा निरोप घेतला. मात्र, त्या आपल्यामागे एक मोठा वारसा ठेऊन गेल्या.

Countdown to Int'l Women's Day: Remembering the feisty, warm leader Sushma Swaraj
सुषमा स्वराज यांचा राजकीय प्रवास..

स्वराज यांच्या राजकीय प्रवासातील काही ठळक मुद्दे..

  • १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या देशातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या.
  • एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला.
  • देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
  • केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या.
  • लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवलेल्या त्या पहिल्याच महिला नेत्या.
  • २०१८ मध्ये ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ११ दशलक्षहून अधिक झाली. ज्यामुळे त्या जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या, आणि अर्थातच सर्वाधित फॉलोअर्स असणाऱ्या परराष्ट्र मंत्री झाल्या.
  • २०१९मध्ये इस्लामिक सहकारी संघटनेच्या बैठकीला, सन्माननीय अतिथी म्हणून संबोधित करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या.
  • हरियाणा राज्य विधानसभेने त्यांना सर्वोत्कृष्ट वक्त्या म्हणून गौरवले.
  • २००८ आणि २०१० मध्ये सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून गौरव मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला नेत्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.