ETV Bharat / bharat

२०२०च्या पहिल्या अंतराळयात्रेसाठी इस्रो सज्ज! 'पीएसएलव्ही सी४९' चे काऊंटडाऊन सुरू

उद्या (शनिवार) इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकल-सी४९ (पीएसएलव्ही सी४९) मार्फत देशाच्या रेडार इमेजिंग उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात येईल. यासोबतच, नऊ परदेशी कृत्रीम उपग्रहांचेही प्रक्षेपण इस्रो करणार आहे...

Countdown for launch of India's radar imaging satellite to begin today
२०२०च्या पहिल्या अंतराळयात्रेसाठी इस्रो सज्ज! 'पीएसएलव्ही सी४९' चे काऊंटडाऊन सुरू
author img

By

Published : Nov 6, 2020, 9:16 AM IST

चेन्नई : कित्येक महिन्यांच्या कालावधीनंतर आता इस्रो पुन्हा अवकाशात यान पाठवण्यासाठी सज्ज झाले आहे. उद्या (शनिवार) इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकल-सी४९ (पीएसएलव्ही सी४९) मार्फत देशाच्या रेडार इमेजिंग उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात येईल. यासोबतच, नऊ परदेशी कृत्रीम उपग्रहांचेही प्रक्षेपण इस्रो करणार आहे.

काऊंटडाऊन सुरू होणार

यासाठीचे काऊंटडाऊन आज सुरू होणार आहे. हे २६ तासांचे काऊंटडाऊन असणार आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता हे रॉकेट दहा कृत्रीम उपग्रहांना घेऊन उड्डाण करेल. श्रीहरीकोटाच्या रॉकेट पोर्टवरुन हे प्रक्षेपण होणार आहे. २०२०मधील इस्रोची ही पहिलीच अवकाश यात्रा असणार आहे.

नऊ विदेशी उपग्रह..

इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या नऊ विदेशी उपग्रहांमध्ये लिथुआनिया (१), ल्युक्सेमबोर्ग (४) आणि अमेरिकेच्या (४) उपग्रहांचा समावेश आहे. मात्र, मुख्यत्वे पीएसएलव्ही सी ४९ मार्फत भारताचा रेडार इमेजिंग उपग्रह इओएस-०१ हा अवकाशात पाठवण्यात येणार आहे. यामध्ये सिंथेटिक अपार्चर रेडार (एसएआर) बसवले आहे, जे कोणत्याही प्रकारच्या हवामानात स्पष्ट छायाचित्रे घेऊ शकते.

पीएसएलव्ही सी-५० आणि जीएसएलव्हीही सज्ज..

विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी यापूर्वीच सांगितले होते, की पीएसएलव्ही सी४९, पीएसएलव्ही सी५० आणि जीएसएलव्ही ही अवकाशयाने उड्डाणासाठी सज्ज होत आहेत. पीएसएलव्ही सी४९ नंतर पीएसएलव्ही सी५० चे प्रक्षेपण होणार आहे. हे अवकाशयान जीसॅट-१२आर उपग्रहाला अंतराळात सोडण्यासाठी वापरण्यात येईल. पीएसएलव्ही यानांना उड्डाणाच्या तयारीसाठी ३० दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे पीएसएलव्ही सी५०चे प्रक्षेपण डिसेंबरमध्ये करण्यात येणार असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले.

पाच मार्चलाच होणार होते प्रक्षेपण

पीएसएलव्ही सी५०च्या प्रक्षेपणानंतर जीएसएलव्ही यानाचे प्रक्षेपण करण्यात येईल, ज्यामार्फत जीआयएसएटी-१ हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येईल. याचे प्रक्षेपण यापूर्वी पाच मार्चला होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते आणखी पुढे ढकलले गेले, असे सोमनाथ यांनी सांगितले.

हेही वाचा : राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.