कोलकाता - भारतामध्ये कोरोना विषाणूने हात-पाय पसरायला सुरवात केली आहे. भारतामध्ये एकूण रुग्णांची संख्या 81 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नागरिकांना हस्तांदोलन टाळत हात जोडून नमस्कार करण्याचा सल्ला दिला आहे.
'जोपर्यंत कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही. तोपर्यंत हस्तांदोलन टाळा. एक व्यक्ती दुसऱया व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना परसत आहे. त्यामुळे हस्तांदोलन टाळत हात जोडून नमस्कार करा', असे ममता बँनर्जी म्हणाल्या.
-
West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Don't shake hands until the #CoronaVirus goes. It's a human to human contact thing, not human to animals. Do namaste. pic.twitter.com/j7HVmCAu5C
— ANI (@ANI) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Don't shake hands until the #CoronaVirus goes. It's a human to human contact thing, not human to animals. Do namaste. pic.twitter.com/j7HVmCAu5C
— ANI (@ANI) March 13, 2020West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Don't shake hands until the #CoronaVirus goes. It's a human to human contact thing, not human to animals. Do namaste. pic.twitter.com/j7HVmCAu5C
— ANI (@ANI) March 13, 2020
कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारने देशात कार्यक्रम आयोजित न करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आम्ही कमी कार्यक्रम घेत आहोत. मात्र, शेवटच्या वेळी कार्यक्रम रद्द करता येत नाही. कारण, कार्यक्रमासाठी दुरच्या ठिकाणांवरून येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी आम्ही कमी कार्यक्रम घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. तसेच अनेक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकराने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवरुन नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. ०११ - २३९७८०४६ हा क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे.