नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिलपर्यंत बंदची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार, मजुरांची कुंचबणा होत असून उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोना विषाणूने मरण आलेलं चांगल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
#WATCH Rajwati, a daily wage labourer, at Delhi's Fatehpur Beri: We are surviving without food & water here. We request the government to help us. It is better to die of this disease (#COVID19) rather than dying of hunger. #CoronavirusLockdown pic.twitter.com/qa19hI7wVC
— ANI (@ANI) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Rajwati, a daily wage labourer, at Delhi's Fatehpur Beri: We are surviving without food & water here. We request the government to help us. It is better to die of this disease (#COVID19) rather than dying of hunger. #CoronavirusLockdown pic.twitter.com/qa19hI7wVC
— ANI (@ANI) March 26, 2020#WATCH Rajwati, a daily wage labourer, at Delhi's Fatehpur Beri: We are surviving without food & water here. We request the government to help us. It is better to die of this disease (#COVID19) rather than dying of hunger. #CoronavirusLockdown pic.twitter.com/qa19hI7wVC
— ANI (@ANI) March 26, 2020
दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी येथील चंदन होला भागात मजुरांचे घर आहे. येथील महिला कामगार, पुरुष मजूर दररोज स्वत: चे आणि मुलांच्या पोटापाण्यासाठी काम करतात. मात्र, काम बंद असल्याने त्यांचे हाल होत असून घरात अन्न आणि पैसाही नाही. त्यांनी गेल्या 4 दिवसांपासून काहीही खाल्लेले नसून दीडशेहून अधिक मजूर कुटुंबे आणि त्यांची मुले उपासमारीने त्रस्त आहेत.
लॉकडाऊननंतर गरीब व असंघटीत कामगारांच्या कुटूंबांसमोर उदरनिर्वाहाचा कठीण प्रश्न उभा ठाकला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सर्वसामान्यांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. देशातील जवळपास ८० कोटी जनतेला याचा फायदा होणार आहे. प्रतिव्यक्ती ७ किलो राशन पुरविण्यात येणार आहे.