ETV Bharat / bharat

पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद, कोरोनाच्या प्रसारामुळे दिल्ली सरकारचा निर्णय

दिल्ली सरकारने शाळांसाठी एक नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित एक रुग्ण आढळला आहे. तर शेजारील उत्तरप्रदेश राज्यातील गाझियाबादमध्ये दुसरा रुग्ण आढळला आहे.

convid 19
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 5, 2020, 5:03 PM IST

Updated : Mar 5, 2020, 7:23 PM IST

नवी दिल्ली - आत्तापर्यंत देशभरामध्ये कोरोनाचे ३० रुग्ण आढळले आहेत. तर २८ हजार जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत पाचवीपर्यंतच्या सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया माहिती देताना

हेही वाचा - गाझियाबादमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण, देशातील एकूण संख्या ३० वर..

दिल्ली सरकारने शाळांसाठी एक नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित एक रुग्ण आढळला आहे. तर शेजारील उत्तरप्रदेश राज्यातील गाझियाबादमध्ये दुसरा रुग्ण आढळला आहे. आग्र्यामध्येही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानमध्ये ईटलीहून आलेल्या १६ परदेशी नागरिकांना कोरोना झाल्याचे तपासणीत समोर आले आहे.

हेही वाचा - राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले...

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिले उत्तर

१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. N-९५ मुखवटे (मास्क) आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.

हेही वाचा - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 वर, 28 हजार 529 संशयीत देखरेखीखाली

संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक 'कॉल सेंटर'ही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत. इराणमधील तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.

चीनमधील वुहानमध्ये अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथून आलेल्या नागरिकांची 'टेस्ट निगेटिव्ह' आहे. चीन, जापन, इटलीला जाणाऱ्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. गरज नसेल तर चीन आणि इटलीला जाऊ नका. ४ मार्चपर्यंत ६ लाख ११ हजार १७६ प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मदतीसाठी आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

Last Updated : Mar 5, 2020, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.