मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला भारतातून हाकलून लावण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. मुंबईमध्ये चीनी समुपदेशक टँग ग्वोकै आणि काही बौद्ध साधूंसोबत ते 'गो कोरोना.. गो कोरोना..' असा जप करताना दिसून येत आहेत.
हा व्हिडिओ खरेतर २० फेब्रुवारीला मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ रेकॉर्ड करण्यात आला होता. चीनमधील कोरोना विषाणूचा कहर थांबावा यासाठी आयोजित प्रार्थनासत्रादरम्यान हा व्हिडिओ घेण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
गतवर्षी चीनमध्ये उदयास आलेल्या या विषाणूचा आता जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये प्रसार झाला आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून, चार हजारांहून अधिक लोकांचा या विषाणूमुळे बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचे आतापर्यंत सुमारे ६० रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा : COVID-19 : 'डेल' अन् 'माईंडट्री'चे दोन कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह..