ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू...

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ताजपूर येथे कार्यरत असलेले डॉ. निजामुद्दीन यांना 10 दिवासांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

author img

By

Published : Apr 20, 2020, 12:47 PM IST

Corona positive doctor dies in Uttar Pradesh

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित डॉक्टरवर तीर्थंकर महावीर वैद्यकीय विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र ताजपूर येथे कार्यरत असलेले डॉ. निजामुद्दीन यांना 10 दिवासांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचेही विलगीकरण करण्यात आले होते. डॉ. निजामुद्दीन हे गेल्या आठ दिवसांपासून विलगीकरण कक्षात होते.

प्रशासनाने ताजपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कर्माचाऱ्यांनाही विलगीकरण कक्षात पाठवले आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 56 आहे. तर कोरोनामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण 1 हजार 84 कोरोनाबाधित आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.