हैदराबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन बोलताना सर्व भारतियांसाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य योजना जाहीर केली. यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला एक क्रमांक दिला जाईल त्यामध्ये त्याची आरोग्य विषयक उपचारांची सर्व माहिती असेल, असे मोदींनी सांगितले. कोरोना संकटात लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचेही मोदींनी कौतुक केले. एकदा लस तयार झाली की तिची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचा मानस असल्याचेही पंतप्रधांनांनी सांगितले. शनिवार सकाळच्या माहितीनुसार देशाती कोरोना रुग्णांच्या संख्येने 25 लाखांचा टप्पा पार केला आहे. 18 लाख 8 हजार 836 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 6 लाख 68 हजार 220 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशात 49 हजार 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र
मुंबई- शनिवारी महाराष्ट्रात १२ हजार ६१४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ४०९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात शनिवारी ६,८४४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आजवर राज्यात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बिहार
पाटणा- शनिवारी बिहार राज्यात 3 हजार 536 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 1 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असणारे बिहार हे आठवे राज्य ठरले आहे.राज्यात सध्या 36 हजार 237 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बिहारची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 2 हजार 906 वर पोहोचली आहे. 65 हजार जण कोरोनामुक्त झाले असून 515 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या. शनिवारी 1.61 लाख तर शुक्रवारी 1.21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या.
झारखंड
रांची- शनिवारी झारखंड राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 1242 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णसंख्या 22 हजार 192 वर पोहोचली आहे. दिवसभरात 16 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 225 झाली आहे. 13 हजार 811 जण कोरोनामुक्त झाले असून 8 हजार 156 जणांवर उपचार सुरु आहेत. शनिवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये रांचीतील बिरसा मुंडा सेंट्रल जेल मधील 100 बंदिवानांचा समावेश आहे. रांची मध्ये 276 , पूर्व सिंघभूम मध्ये 169 तर गिरिधीह मध्ये 107 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
उत्तराखंड
डेहराडून-उत्तराखंड राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 940 वर पोहोचली आहे. शनिवारी 325 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 3997 जणांवर उपचार सुरु असून 7748 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे 151 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 65.16 एवढा आहे.