नवी दिल्ली- भारतात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 19148 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत आणि 434 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 4 हजार 641 वर पोहोचली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
देशातील एकुण कोरोनाबाधित रुग्णसंख्येपैकी 3 लाख 59 हजार 860 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 2 लाख 26 हजार 947 रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे 17 हजार 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरात मध्ये आढळले आहेत. आज सकाली 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1लाख 80 हजार 298 वर पोहोचली आहे. 93154 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात 8053 मृत्यू झाले आहेत, आहेत असे ट्विट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या इंडिया फाईटस कोरोना या ट्विटर अकाँंऊंट वरुन देण्यात आली आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाच्या 90 लाख 56 हजार 173 टेस्ट घेतल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आश्विनी चौबे यांनी सांगितले. मागील 24 तासात 2 लाख 29 हजार 588 कोरोना टेस्ट करण्यात आल्या, असेही ते म्हणाले आहेत. देशात सध्या 768 सरकारी प्रयोगशाळा आणि 297 खासगी प्रयोगशाळांतून कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 59.51 वर पोहोचला आहे, असे आश्विनी चौबे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.