ETV Bharat / bharat

गोव्यात कोरोणा संसर्ग झालेला संशयित आढळला; गोवा सरकारने कृती दलाची केली स्थापना - corona virus goa

कोरोणा व्हायरसची लागण १४ वर्षांखालील मुलांना होत नाही. ज्येष्ठांमध्ये ज्यांना काही आजारांचा त्रास आहे अशांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. गोव्यात जो संशयित आढळून आला आहे. तो चीनमधून आलेला प्रवासी आहे. त्याची संशयित म्हणून तपासणी करण्यात आली असून त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसात त्याच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त होईल, असेही बांदेकर यांनी सांगितले.

sanjiv kumar on corona
माहिती देताना गोव्याचे आरोग्य सचिव
author img

By

Published : Jan 28, 2020, 11:46 PM IST

पणजी (गोवा)- आज गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कोरोणा संसर्ग झालेला संशयित प्रवाशी आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या विषाणूचा सामना करण्यासाठी गोवा सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे.

माहिती देताना गोव्याचे आरोग्य सचिव संजयकुमार

गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे, याचा प्रतिबंध करण्यासाठी गोवा सरकारने कृतीदलाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य संचालनालय खासगी रुग्णालय आदींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी कृती दलाची उच्च पातळीवरील बैठक पार पडली. यामध्ये गोव्याचे आरोग्य सचिव संजयकुमार, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालनालयाचे डॉ. जोश डिसा, डॉ. उत्कर्ष बेतोडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजयकुमार म्हणाले, कोरोणा विषाणूचा सामना करण्यासाठी गोव्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. देशात या संदर्भातील संशयितांचे सर्व नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. परंतु, एकही नमुना सकारात्मक आलेला नाही. हा विषाणू चीनमधून जगभर पसरला असल्याने केंद्र सरकारने थेट चीनमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी काही विमानतळावर 'थर्मल स्कॅनिंग' ची सुविधा उपलब्ध केली आहे. गोवा सरकारनेही नागरी उड्डाण खात्याकडे गोव्यातही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आज गोव्यात कोरोणा व्हायरसग्रस्त संशयित प्रवाशी आढळून आला आहे. त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहे. त्याचा रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

आजार आणि दक्षता याविषयी बोलताना डॉ. बांदेकर म्हणाले, या आजाराचे लक्षण म्हणजे सर्दी आणि श्वसनाचा त्रास होऊन त्याचा परिणाम मुत्रपिंडावर होऊन ते निकामी होते. यावर अद्याप लस उपलब्ध नसून संशोधन सुरू आहे. आतापर्यंत देशात अशा संशयितांपैकी ५३ जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. गोवा सरकारने आवश्यक काळजी घेण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली असून एक धोरण निश्चित केले आहे की, जर अशा प्रकारचा एखाद्या संशयित आढळला तर त्याला दक्षिण गोव्यातील चिखलीमधील रुग्णालयात दाखल केले जाईल.

रुग्णांचा गोमेकॉमध्ये उपचार केले जाईल. यासाठी ३० खाटांची सुविधा असलेला विभाग तयार करण्यात आला आहे. रुग्ण गंभीर असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून २ खाटांची सुविधा असलेला आयसीयू विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच सर्व ठिकाणी ९५ मास्क आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोणा व्हायरसची लागण १४ वर्षांखालील मुलांना होत नाही. ज्येष्ठांमध्ये ज्यांना काही आजारांचा त्रास आहे अशांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. गोव्यात जो संशयित आढळून आला आहे. तो चीनमधून आलेला प्रवासी आहे. त्याची संशयित म्हणून तपासणी करण्यात आली असून त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसात त्याच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त होईल, असेही बांदेकर यांनी सांगितले.

हेही वाचा- वादग्रस्त घोषणाबाजीनंतर अनुराग ठाकूर अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस

Intro:पणजी : आज गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कोरोणा संसर्ग झालेला संशयित प्रवाशी आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याविषाणूचा सामना करण्यासाठी गोवा सरकारने क्रूतीदलाची स्थापना केली आहे.

Body:गोव्यात पर्यटक येत असतात. त्यामुळे याचा प्रतिबंध करण्यासाठी गोवा सरकारने क्र्रूतीदलाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य संचालकनालय खाजगी इस्पितळ आदींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी या क्रुती दलाची उच्च पातळीवरील बैठक पार पडली. यामध्ये गोव्याचे आरोग्य सचिव संजयकुमार, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालनालयाचे डॉ. जोश डिसा, डॉ. उत्कर्ष बेतोडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजयकुमार म्हणाले, कोरोणा विषाणूचा सामना करण्यासाठी गोव्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. देशात या संदर्भातील संशयितांचे सर्व नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. परंतु, एकही सकारात्मक आलेला नाही. हा विषाणू चीनमधून जगभर पसरला असल्याने केंद्र सरकारने थेट चीनमधून येणाऱ्या विमानांतील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी काही विमानतळावर ' थर्मल स्कँनिंग'ची सुविधा उपलब्ध केली आहे. गोवा सरकारनेही नागरि उड्डाण खात्याकडे गोव्यातही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आज गोव्यात अशा प्रकारचा संशयित प्रवाशी आढळून आला आहे. ज्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहे. त्याचा रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
तर आजार आणि दक्षता याविषयी बोलताना डॉ. बांदेकर म्हणाले, या आजाराचे लक्षण म्हणजे सर्दी आणि श्वसनाचा त्रास होऊन त्याचा परिणाम मुत्रपिंडावर होऊन ते निकामी होते. यावर अद्याप लस उपलब्ध नसून संशोधन सुरू आहे. आतापर्यंत देशात अशा संशयितांपैकी 53 जणांवर उपचार करून इस्पितळातून घरी सोडण्यात आले आहेत. गोवा सरकारने आवश्यक काळजी घेण्यासाठी क्रूतीदलाची स्थापना केली असून एक धोरण निश्चित केले आहे की, जर अशा प्रकारचा एखाद्या संशयित आढळला तर त्याला दक्षिण गोव्यातील चिखलीमधील इस्पितळात दाखल केले जाईल. तर गोमेकॉमध्ये उपचार केले जातील. यासाठी 30 खाटांची सुविधा असलेला विभाग तयार करण्यात आला आहे. रुग्ण गंभीर असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून 2 खाटांची सुविधा असलेला आयसीयु विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच सर्व ठिकाणी मास्क 95 आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याची लागण 14 वर्षांखालील मुलांना होत नाही. ज्येष्ठांमध्ये ज्यांना काही आजारांचा त्रास आहे, अशांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.
गोव्यात जो संशयित आढळून आला आहे. तो चीनमधून आलेला प्रवासी आहे. त्याची संशयित म्हणून तपासणी करण्यात आली असून त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांत त्याच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईल, असेही बांदेकर यांनी सांगितले.
....
इंग्रजी बाईट संजयकुमार
तर मराठी डॉ. शिवानंद बांदेकर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.