ETV Bharat / bharat

योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण - उत्तर प्रदेश कोरोना

मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली असून, त्यांना ग्रेटर नोएडामधील एका रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यानंतर या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्या पोलिसांनी स्वतःला अलगीकरणात ठेवले आहे.

Cop deployed in Yogi Adityanath's security contingent tests COVID-19 positive
योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण
author img

By

Published : Aug 10, 2020, 6:59 PM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी याबाबतची माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली असून, त्यांना ग्रेटर नोएडामधील एका रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यानंतर या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्या पोलिसांनी स्वतःला अलगीकरणात ठेवले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अ‌ॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी ४७ हजार ८९०वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात ७२ हजार ६५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, आतापर्यंत कोरोनाच्या २ हजार ६९ बळींची नोंद राज्यात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.