रायपूर - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र, या काळात देखीस सफाई कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. तरीही लॉकडाऊनच्या काळात या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे.
फक्त ६०० वेतन मिळतेय -
महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना फक्त ६ हजार रुपये वेतमन मिळते. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होत नाही. तरीही आम्ही आपले काम प्रामाणिकपणे करत असतो. लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरामध्ये बंद झाले आहेत. मात्र, आम्ही रस्त्यावर उतरून स्वच्छता करत असतो. त्यासाठी सुरक्षा कीट दिले असल्याचे सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करू नये, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांच्या १० दिवसांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ण देण्याचे आदेश महापौरांनी ठेकेदारांना दिले होते. मात्र, ठेकेदाराने यावर लक्ष न देता त्यांच्या पगारामध्ये कपात केली आहे.