इस्लामाबाद - कुलभूषण जाधव यांना सोमवार सप्टेंबर २ रोजी कन्स्युलर अॅक्सेस देण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे.
विदेशी कार्यालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले, जाधव यांना कन्स्युलर संबंधावरील व्हिएन्ना कॉन्वेशन, आयसीजेचा निकाल आणि पाकिस्तानी कायद्यांच्या अनुशंगाने कन्स्युलर अॅक्सेस दिला जात आहे.
काय आहे कन्स्युलर अॅक्सेस..?
एखाद्या देशात दुसऱ्या देशाचा कैदी असल्यास, त्या कैद्याला त्याच्या देशाच्या राजदूताशी भेटण्याची संधी देणे म्हणजे कन्स्युलर अॅक्सेस देणे. याआधी, वारंवार मागणी करुन देखील पाकिस्तानने जाधव यांना कन्स्युलर अॅक्सेस मिळू दिला नव्हता. मात्र, व्हिएन्ना कॉन्वेशन आणि आयसीजेच्या निकालाच्या दबावाने पाकिस्तान आता नरमला आहे.
भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी असलेले जाधव हे पाकिस्तानात शिक्षा भोगत आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा दिली आहे. जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर चुकीचा आळ घेऊन पाकिस्तानने फाशीची शिक्षा दिली या मतावर भारत ठाम आहे.
हेही वाचा : चक्क एका पाकिस्तानी नेत्याने गायले 'सारे जहाँ से अच्छा'