ETV Bharat / bharat

संविधान दिनानिमित्त दोन्ही सभागृह एकत्र येणार; कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील उपस्थित राहणार आहेत. तर संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू असताना विरोधी पक्ष हे संसदेच्या आवारामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत.

Parliament
प्रतिकात्मक - संसद
author img

By

Published : Nov 26, 2019, 5:08 AM IST

Updated : Nov 26, 2019, 6:10 AM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या राजकारणाचे पडसाद देशपातळीवर उमटत आहेत. देशात 70 वा संविधान साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन्ही सभागृहे संयुक्तपणे बोलाविली आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भाषण करणार आहेत. या कार्यक्रमावर शिवसेनेसह विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे.

संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेदेखील उपस्थित राहणार आहेत. तर संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू असताना विरोधी पक्ष हे संसदेच्या आवारामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत.

  • #ConstitutionDay: Opposition parties will boycott the President Ram Nath Kovind's address at the joint sitting of Parliament tomorrow. They will also protest in front of the Ambedkar Statue in Parliament.

    — ANI (@ANI) November 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रपती हे संसदेच्या सेंट्रल हॉलमधून डिजीटल प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. दोन्ही सभागृहांचे संयुक्तपणे सकाळी 11 वाजता सत्र बोलाविण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज 2 वाजता सुरू होणार आहे.

मुलभूत कर्तव्य आणि संविधानाबद्दल जागृती होण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Intro:Body:

Dummy News

Conclusion:
Last Updated : Nov 26, 2019, 6:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.