ETV Bharat / bharat

'सरकारच्या हातात संविधानाची मूल्ये असुरक्षित' - Constitutional values not safe

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : Jan 25, 2020, 11:31 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधी यांनी पत्रक जारी करून देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप सरकारच्या राजवटीमध्ये संविधानाची घटनात्मक मूल्य सुरक्षित नाहीत. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी लोकांमध्ये धार्मिक फूट पाडली जात असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

  • गणतंत्र दिवस 2020 की पूर्व संध्या पर कांग्रेस अध्यक्ष, श्रीमती सोनिया गांधी का संदेश pic.twitter.com/YUx9TBNJn0

    — Congress (@INCIndia) January 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
देशातील सामान्य नागरिकांना आता हे समजण्यास सुरुवात झाली आहे की, भाजप सरकारच्या राजवटीमध्ये संविधानाची घटनात्मक मूल्य सुरक्षित नाहीत. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी लोकांमध्ये धार्मिक फूट पाडण्याचे आणि राज्यघटना कमकुवत करण्याचा सरकारने कट रचला आहे. देशाच्या संविधानावर हल्ला होत असून संविधानीक संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी संविधानाचे रक्षन करण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.
देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. देशाचे भविष्य असलेले तरुण बेरोजगार आहेत. आर्थिक मंदीमुळे छोटेखानी व्यावसायिकांवर गदा आली आहे. आर्थिक प्रगती रखडली असून अर्थव्यवस्था हादरली आहे. याविरोधात आवाज उठविणार्‍या प्रत्येकावर शासकीय यंत्रणेचे दडपण चक्र चालवले जात आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. देशामध्ये अप्रत्यक्षरित्या अशांतता आणि असुरक्षीत वातावरण निर्माण केले आहे. प्रत्येक नागरिकाने सरकारच्या या नितीचा निषेध करायला हवा. लोकशाही जपण्यासाठी, संविधानाची सुरक्षा आणि देशाची एकता अबाधीत ठेवण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्याची भावना आत्मसात केली पाहिजे. हेच राज्यघटनेविषयी आणि देशभक्तीविषयी खरी बांधिलकी दर्शविणारे कार्य आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.

Intro:Body:

'सरकारच्या हातात संविधानाची मूल्ये असुरक्षित'

नवी दिल्ली -  काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  सोनिया गांधी यांनी पत्रक जारी करून देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप सरकारच्या राजवटीमध्ये संविधानाची घटनात्मक मूल्य सुरक्षित नाहीत. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या समस्यांपासून  लक्ष हटवण्यासाठी लोकांमध्ये धार्मिक फूट पाडली जात असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

देशातील सामान्य नागरिकांना आता हे समजण्यास सुरवात झाली आहे की, भाजप सरकारच्या राजवटीमध्ये संविधानाची घटनात्मक मूल्य सुरक्षित नाहीत. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या समस्यांपासून  लक्ष हटवण्यासाठी लोकांमध्ये धार्मिक फूट पाडण्याचे आणि राज्यघटना कमकुवत करण्याचा सरकारने कट रचला आहे. देशाच्या संविधानावर हल्ला होत असून संविधानीक संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी संविधानाचे रक्षन करण्याची  जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.

देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. देशाचे भविष्य असलेले तरुण बेरोजगार आहेत. आर्थीक मंदीमुळे छोटेखानी व्यावसायिकांवर गदा आली आहे. आर्थिक प्रगती रखडली असून अर्थव्यवस्था हादरली आहे. याविरोधात आवाज उठविणार्‍या प्रत्येकावर शासकीय यंत्रणेचे दडपण चक्र चालवले जात आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

देशामध्ये अप्रत्यक्षरित्या अशांतता आणि असुरक्षीत वातावरण निर्माण केले आहे. प्रत्येक नागरिकाने सरकारच्या या नितीचा निषेध करायला हवा. लोकशाही जपण्यासाठी, संविधानाची सुरक्षा आणि देशाची एकता आबाधीत ठेवण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्याची भावना आत्मसात केली पाहिजे. हेच राज्यघटनेविषयी आणि देशभक्तीविषयी खरी बांधिलकी दर्शविणारे कार्य आहे, असे सोनिया गांधी यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.