जोधपूर (राजस्थान) - बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राजस्थानमधील पोलिसांची टीम गेली होती. कारवाईनंतर पुन्हा परतत असताना त्यांची गाडी पंक्चर झाली होती. यावेळी एक शिपाई बंदूक साफ करत असताना बंदुकीतून गोळी निघाली आणि दुसऱ्या पोलिसाला लागली. तत्काळ जखमी शिपायाला जोधपूर रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र, यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक राहुल बारठ यांनी सांगितले, की बिलाडा येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची टीम गेली होती. यावेळी ही घटना घडली. यानंतर पोलीस उपअधीक्षक सुरेश कुमार आणि रायपूर पोलीस निरीक्षका घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे