ETV Bharat / bharat

काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक...नेतृत्व बदलासह पक्षाच्या पुनरुज्जीवनावर होणार विचारमंथन - काँग्रेस कार्यकारिणी बैठक बातमी

काँग्रेसच्या वरिष्ठ २३ नेत्यांनी पक्षाला प्रभावी नेतृत्व मिळावे, या मागणीसाठी एक पत्र लिहले आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाची संस्थात्मक घडी नीट करण्याची आणि नेतृत्त्वाची मागणी नेत्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे.

congress working committee
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 24, 2020, 4:54 AM IST

नवी दिल्ली - २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. तो अजूनही सावरलेला नाही. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस चितपट झाली. त्यानंतर तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ २३ नेत्यांनी पक्षाला प्रभावी नेतृत्व मिळावे, या मागणीसाठी एक पत्र लिहले आहे. काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाची संस्थात्मक घडी नीट करण्याची आणि नेतृत्त्वाची मागणी नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, देशातल्या विविध राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळावी, अशी मागणी केली आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधीनी नेतृत्त्व सांभाळावे, यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार, आसामचे पक्षाध्यक्ष रुपीन बोरा, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेणार नाही. मात्र, नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचे उत्तर म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस कार्यकारिणी समिती, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांनी मिळून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पक्षांतर्गत काही बदलांची अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज(सोमवार) बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी हे पत्र लिहिले होते.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मात्र सोनिया गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. राजीनामा देताना राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीला असे सुचवले होते, की पक्षाचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाशी संबंधित नसावा. प्रियांका गांधींनीही एका मुलाखतीमध्ये राहुल यांची याबाबत पाठराखण केली होती. मात्र, पक्षातील कित्येक नेत्यांना अजूनही गांधी कुटुंबातील सदस्यानेच अध्यक्षपदी असावे, असे वाटते.

याव्यतिरिक्त आणखी कोणी पक्षाच्या अध्यक्षस्थानी आल्यास पक्षामध्ये फूट पडण्याची भीती हे नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे बैठकीमध्ये सोनिया गांधींचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही याबाबत साशंकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आहे. देशातील तरुण पक्षापासून दुरावलेला दिसून येत आहे. पक्षाला मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णवेळ नेतृत्वही नाही. देशावर कोरोनाचे संकट असताना, अर्थव्यवस्था ढासळली असतानाही मोदींची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे अनेक पोलमधून समोर आले आहे. आता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आवाज उठवला आहे.

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काय म्हणतात?

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे, त्यांची गरज केवळ पक्षासाठी नाही तर देशासाठी आहे, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना केली आहे.

राहुल गांधी यांचं नेतृत्व हे एक समर्थ नेतृत्व आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि अध्यक्षपदी स्वीकारावे, अशी मागणीही थोरात यांनी एक ट्विट करून आणि त्यानंतर राहुल गांधी यांना एक विनंतीचे पत्र लिहून केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.