नवी दिल्ली - हाथरस अत्याचारप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुकी करण्यात आली. या घटनेचा देशातील सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने एक ट्विट करणयात आले आहे. 'लाठियों से गांधी न तब डरे थे, लाठियों से गांधी न अब डरेंगे,' असे म्हणत काँग्रेसने केंद्र सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.
-
लाठियों से गांधी न तब डरे थे, लाठियों से गांधी न अब डरेंगे।
— Congress (@INCIndia) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">लाठियों से गांधी न तब डरे थे, लाठियों से गांधी न अब डरेंगे।
— Congress (@INCIndia) October 1, 2020लाठियों से गांधी न तब डरे थे, लाठियों से गांधी न अब डरेंगे।
— Congress (@INCIndia) October 1, 2020
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काल (गुरुवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देशात काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत आहेत. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. ‘लाठियों से गांधी न तब डरे थे, लाठियों से गांधी न अब डरेंगे’ आशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी शांततेत काढलेल्या आंदोलनाची तुलना त्यांनी महात्मा गांधींच्या आंदोलनाशी केली आहे. महात्मा गांधी तेव्हाही लाठ्यांना घाबरले नाही आणि आता राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही लाठ्यांना घाबरणार नाहीत, असे काँग्रेसने म्हटले आहे.