नवी दिल्ली - सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक झाली. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची अनुपस्थिती होत्या. काँग्रेस शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास अनुत्सुक आहे. याबाबत काँग्रेसने वेट ॲण्ड वॉच अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी काँग्रेसने भाजपला दोषी ठरवले आहे. युती करताना शिवसेना आणि भाजपमध्ये काय ठरलं त्याप्रमाणे त्यांनी सरकार स्थापना करायला हवे होते. आता भाजप ठरल्याप्रमााणे वागत नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे नाना पटोले इत्यादी नेते उपस्थित होते.