ETV Bharat / bharat

गुजरातमधील राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी एका मताची गरज; काँग्रेसचा दावा - दुसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला एका मताची गरज

गुजरातमधील राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला एका मताची गरज आहे. गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी हा दावा केलाय. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक जवळ आली असताना काही काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

RajyaSabha Member election
राज्यसभा सदस्य निवडणूक
author img

By

Published : Jun 7, 2020, 4:18 PM IST

नवी दिल्ली- राज्यसभा सदस्य निवडणूक जवळ आली असताना गुजरातमधील काही काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, आम्हाला राज्यातील राज्यसभेची दुसरी जागा जिंकण्यासाठी एका मताची गरज असल्याचा दावा गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी केला. त्यांनी या विषयी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

संख्याबळाविषयी चर्चा न करण्याचे पक्षाचे धोरण आहे. 2017 मध्ये काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे विजयी झाले होते, याचीही आठवण राजीव सातव यांनी करुन दिली. विजयासाठी लागणाऱ्या संख्याबळाबद्दल आमचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 77 जागांवर विजय मिळवला होता. सध्या त्यांच्याकडे 65 आमदार आहेत. काँग्रेसने त्यांचे आमदार अंबाजी, बडोदा आणि राजकोटला हलवले आहेत.

काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भारतसिंह सोळंकी यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या पसंतीची मते गोहिल यांना मिळणार आहेत. दुसऱ्या जागेवर भारतसिंह सोळंकी यांना भाजपच्या नरहीर अमीन यांच्याशी लढावे लागणार आहे. माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी आणि भारतसिंह सोळंकी यांच्या बद्दल असलेली सहानुभुती काँग्रेसला फायदेशीर ठरते का पाहावे लागणार आहे. काँग्रेसने राजीव शुक्ला यांचे नाव दुसऱ्या जागेसाठी सुचवले होते. मात्र, प्रदेश काँग्रेसने शुक्ला यांच्या नावाला विरोध केला.

दरम्यान, मध्यप्रदेशात काँग्रेसकडून दिग्विजय सिंह आणि भाजपकडून ज्योतीरादित्य सिंधीया निवडून येतील. मात्र काँग्रेसचे दुसरे उमेदवार फुलसिंह भरैया यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसला ताकद पणाला लावावी लागणार आहे. 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 92 वर आलेय. कर्नाटकात मल्लिकार्जून खर्गे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पण अनेकजण इच्छुक असल्याने पक्षांतर्गत नाराजी निर्माण होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.