ETV Bharat / bharat

'कुठं गंगा आणि कुठं घाण गटार'... काँग्रेस खासदाराची मोदींवर वादग्रस्त टिप्पणी - राजेंद्र अग्रवाल

कुठे गंगा आणि कुठे घाण गटार... चौधरींच्या या वक्तव्यानंतर संसदेत एकच गदारोळ उडाला. या गदारोळातच चौधरी म्हणाले, आम्ही पंतप्रधानांचा सन्मान करतो. परंतु, अशी तुलना करुन आम्हाला बोलायला भाग पडू नका.

काँग्रेस खासदार अधीर चौधरी
author img

By

Published : Jun 24, 2019, 4:59 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेच्या आजच्या कामकाजात काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याने मोठा गदारोळ झाला. यामुळे चौधरी यांच्याविरोधात भाजप खासदारांनी बराच वेळ गोंधळ घातला. वाढता गोंधळ पाहून राजेंद्र अग्रवाल यांनी खासदारांना शांत राहण्याचे अपील केले.

भाजपचे खासदार प्रताप सारंगी लोकसभेत बोलताना म्हणाले, की अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांचे कौतुक केले होते तर, काँग्रेसला पंतप्रधान मोदींबाबत काय त्रास आहे. याला उत्तर देताना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींबाबत टिप्पणी केली. अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेत चौधरी म्हणाले, कुठे गंगा आणि कुठे घाण गटार... चौधरींच्या या वक्तव्यानंतर संसदेत एकच गदारोळ उडाला. या गदारोळातच चौधरी म्हणाले, आम्ही पंतप्रधानांचा सन्मान करतो. परंतु, अशी तुलना करुन आम्हाला बोलायला भाग पडू नका. जर काही आपत्तीजनक टिप्पणी झाली असेल तर त्याला काढून टाकावे.

कामकाज संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले, पंतप्रधान नाराज असतील तर मी माफी मागतो. त्यांना दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी त्यांची वैयक्तीक माफी मागतो. मला गटार हा शब्द उच्चारायचा नव्हता. माझी हिंदी खराब आहे. मला गटार नाही मला कॅनॉल असे म्हणायचे होते.

Intro:Body:

s jayshankar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.