नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी झाले. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयापासून ते गांधी स्मृती भवनापर्यंत शांती मार्च काढण्यात आला.
दरम्यान जनपथ मार्गावर मार्च थांबवण्यात आला आहे. यावेळी प्रियांका गांधी यांनी मार्चला संबोधीत केले.
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारावर काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी उपस्थित होत्या. बैठकीत दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शांती मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला.