ETV Bharat / bharat

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Congress leader Rajiv Tyagi passes away

काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी(५०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज(बुधवार) निधन झाले. त्यागी यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता. मात्र, आज हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले.

file pic
राजीव त्यागी
author img

By

Published : Aug 12, 2020, 9:36 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी(५०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज(बुधवार) निधन झाले. त्यागी यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता. मात्र, आज हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. राजीव त्यागी माध्यमांमधील एक प्रमुख चेहरा होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेत असत. नुकतेच एका टीव्ही चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.

'राजीव त्यागी यांच्या निधनाने काँग्रेसचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ते एका विचारधारेने प्रेरित होते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सद्भावना, असे ट्विट काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले आहे.

  • We are deeply saddened by the sudden demise of Shri Rajiv Tyagi. A staunch Congressman & a true patriot. Our thoughts and prayers are with his families & friends in this time of grief. pic.twitter.com/yHKSlzPwbX

    — Congress (@INCIndia) August 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'राजीव त्यागी यांच्या अचानक जाण्याने अतीव दुख: झाले आहे. त्यागी एक कट्टर काँग्रेस नेते आणि देशभक्त होते. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि मित्रपरिवारासोबत आमच्या सर्वांच्या सद्भावना आहेत, असे ट्विट काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून करण्यात आले आहे.

'काँग्रेस नेते जयवीर शेरगील यांनी राजीव त्यांनी यांच्या निधनावर दुख: व्यक्त केले आहे. 'जवळच्या मित्राचे अचानक निधन झाल्याने धक्का बसला आहे. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि एक चांगली व्यक्ती गमावली आहे. आपल्यातून सोडून जाण्याचे त्यांचे हे वय नव्हते, असे टि्वट शेरगील यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.