नवी दिल्ली - सध्या देशभरात परीक्षांबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे. काही ठिकाणी परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी पयत्न सुरू आहेत. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मागील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सरासरी गुण देऊन पुढील वर्गात ढकलण्यात आले आहे. संबंधित प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलंय.
-
It is extremely unfair to conduct exams during the Covid19 pandemic.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
UGC must hear the voice of the students and academics. Exams should be cancelled and students promoted on basis of past performance.#SpeakUpForStudents pic.twitter.com/1TYY3q58i0
">It is extremely unfair to conduct exams during the Covid19 pandemic.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 10, 2020
UGC must hear the voice of the students and academics. Exams should be cancelled and students promoted on basis of past performance.#SpeakUpForStudents pic.twitter.com/1TYY3q58i0It is extremely unfair to conduct exams during the Covid19 pandemic.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 10, 2020
UGC must hear the voice of the students and academics. Exams should be cancelled and students promoted on basis of past performance.#SpeakUpForStudents pic.twitter.com/1TYY3q58i0
आयआयटीने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र अद्याप यूनिव्हर्सिटी ग्रान्ट कमिशन (यूजीसी) या प्रकरणावर संभ्रम निर्माण करत आहे. यूजीसीनेदेखील मागील परीक्षांच्या सरासरीचे गुण देऊन विद्यार्थ्यांना पास करायला हवे, अशी भूमिका राहूल गांधी यांनी मांडली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे परीक्षांबाबतची सरकाची भूमिका स्पष्ट होण्यास वेळ लागतोय. त्यातच विद्यार्थी आणि पालक यांच्या मुद्द्यांचा देखील विचार व्हायला हवा, अशी भूमिका वेळोवेळी पुढे आलीय. यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांचं काय, हा प्रश्न कायम होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच यूजीसीने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दर्शवला. यामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्सचे पालन करुन परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली. यासंदर्भात कार्यपद्धती देखील जाहीर करण्यात आली.
गृहमंत्रालय 'त्या' निर्णयावर ठाम
यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे केंद्रीय गृह मंत्रलयाने सांगितले. यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रातूनदेखील टीका होत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात पडसाद
लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करणे, हाच पर्याय योग्य असल्याची भूमिका राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलीय. दरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही यूजीसीने दिलेल्या सूचना आणि घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. यूजीसीची भूमिका गोंधळात टाकणारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच करोना काळात परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.