नवी दिल्ली - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनी रविवारी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. भाजपाच्या एका आमदार आणि त्याच्या मुलाने एका आरोपीला पोलीस कोठडीतून घेऊन गेले. या आरोपीला एका महिलेसोबत छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुन 'गुन्हेगारांना वाचवा' हे राज्य व्यवस्थेचे ध्येय आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी एका माध्यमांनी दिलेला अहवालही दिला. त्यात दिले आहे की, भाजपा आमदाराने आपल्या मुलासोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच एका महिलेवर छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यातून घेऊन गेले. यावरुन 'बेटी बचाओ' अभियानाची सुरुवात कशी झाली? यातून 'अपराधी बचाव' हे कुठे चालले आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
-
How it started: बेटी बचाओ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
How it’s going: अपराधी बचाओ pic.twitter.com/N7IsfU7As5
">How it started: बेटी बचाओ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 18, 2020
How it’s going: अपराधी बचाओ pic.twitter.com/N7IsfU7As5How it started: बेटी बचाओ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 18, 2020
How it’s going: अपराधी बचाओ pic.twitter.com/N7IsfU7As5
तर प्रियांका गांधी यांनी एका वृत्तपत्राचा अहवाल देत ट्विट केले, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सांगतील का? की, हे कोणत्या मोहिमेंतर्गत सुरू आहे? बेटी बचाव की अपराधी बचाओ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कथित वाढ झाल्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस राज्य सरकारवर हल्ला चढवत आहे. हाथरस जिल्ह्यातील 19 वर्षीय दलित तरुणीवर चार पुरुषांनी बलात्कार केला होता. यानंतर तिला दिल्लीच्या रुग्णालयात जखमी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या परिवाराची परवानगी न घेता तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर अनेक स्तरांतून टीका झाली. तर याप्रकरणाचा तपास योगी सरकारने सीबीआयकडे सोपवला आहे.