ETV Bharat / bharat

प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या 'या' निर्णयाचे केले स्वागत

देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांना परत आणण्याच्या निर्णयाचे प्रियांका गांधींनी स्वागत केले आहे. तसेच मजुरांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे त्यांनी आभार मानले.

author img

By

Published : Apr 25, 2020, 12:39 PM IST

congress-leader-priyanka-gandhi-welcomed-yogi-govt-move-by-tweeting

नवी दिल्ली - देशातली अनेक राज्यांत रोजगाराच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले उत्तर प्रदेशातील कामगार, मजूर लोक सध्या लॉकडाऊनमुळे तिथेच अडकले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरी परत पोहोचवणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सर्वांनी मिळून एका दिशेने एकत्र प्रयत्न केले तर कोरोनाला पराभूत करणे अशक्य नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच मजुरांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे त्यांनी आभार मानले.

  • अन्य राज्यों में फँसे यूपी के कुछ मजदूरों को वापस लाने की पहल पर उप्र सरकार को साधुवाद। हम लगातार इस मुद्दे पर ज़ोर दे रहे हैं और यह उस दिशा में एक सार्थक कदम है।

    इसे पूरी तरह से सफल होने के लिए बाकी मजदूरों के लौटने के लिए भी योजना बनानी जरूरी है।

    अगर इसी तरह सकारात्मक.. 1/2 https://t.co/k2skJaUbLR

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मी सतत हा मुद्दा मांडला आहे. त्या दिशेने सरकारचे हे एक अर्थपूर्ण पाऊल आहे. ते पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी उर्वरित मजुरांच्या परताव्याची योजना आखणेदेखील आवश्यक आहे. याचप्रकारे जर आपण सकारात्मक वृत्तीने देशहितासाठी सहकार्य करत राहिलो, तर कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला बरीच शक्ती मिळेल, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.

शुक्रवारी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांची यादी बनवण्याचे आदेश दिले आहेत. स्थलांतरित मजुरांना परत राज्यात आणताना त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर मुजारंना अन्नधान्य आणि १ हजार रुपये रोख रकमेसह सुरक्षित त्यांची घरी पोहोचवले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.