ETV Bharat / bharat

INX मीडिया प्रकरण : अखेर १०६ दिवसानंतर पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका

आयएनएक्स माध्यम प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. यावेळी माध्यम प्रतिनीधींनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.

पी. चिदंबरम, P Chidambaram
पी. चिदंबरम
author img

By

Published : Dec 4, 2019, 8:34 PM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यमप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसानंतर चिदंबरम तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी माध्यम प्रतिनीधींनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.

  • Delhi: Congress leader P Chidambaram released from Tihar Jail; Earlier today, Supreme Court granted bail to him in the INX Media money laundering case registered by the Enforcement Directorate. pic.twitter.com/UMd5ic4tER

    — ANI (@ANI) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दोन लाखांच्या जातमुचलक्यावर चिदंबरम यांना जामीन देण्यात आला आहे. या काळात त्यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये अशी अट न्यायालयाने घातली आहे. पुराव्यांशी छेडछाड करणे किंवा साक्षीदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न करु नये, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. तसेच, या खटल्या संबंधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये असेही सांगण्यात आले.आयएनएक्स माध्यम प्रकरणी पी. चिदंबरम यांच्यावर सीबीआय तसेच सक्तवसुली संचलनालयाने मनी लाँड्रीग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
२१ ऑगस्टला सीबीआयने चिदंबम यांना अटक केली होती. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. मात्र, त्याचवेळी ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी जामीन दिला होता. मात्र, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे ते तिहार तुरुंगामध्ये होते. तब्बल १०६ दिवसानंर आता त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे ते नुकतेच तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत.

Intro:Body:

INX मीडिया प्रकरण : अखेर १०६ दिवसानंतर पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका

नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) दाखल केलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसानंतर चिंदबरम तुरुंगातून जामीनावर बाहेर आले आहेत. यावेळी माध्यम प्रतिनीधींनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.

दोन लाखांच्या जातमुचलक्यावर चिदंबरम यांना जामीन देण्यात आला. या काळात त्यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये अशी अट न्यायालयाने घातली. पुराव्यांशी छेडछाड करणे किंवा साक्षीदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न करु नये अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. तसेच, या खटल्या संबंधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये असेही सांगण्यात आले.

आयएनएक्स माध्यम प्रकरणी पी. चिदंबरम यांच्यावर सीबीआय तसेच सक्तवसुली संचलनालयाने मनी लाँड्रीग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. २१ ऑगस्टला सीबीआयने चिदंबम यांना अटक केली होती. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. मात्र, त्याचवेळी ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी जामीन दिला होता. मात्र, ईडी ने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे ते तिहार तुरुंगामध्ये होते. तब्बल १०६ दिवसानंर आता त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे ते नुकतेच तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.