ETV Bharat / bharat

'शेतकऱ्यांच्या संघर्षातून गांधींच्या सत्याग्रहाची झलक' - दिग्विजय सिंह यांची कृृषी आंदोलनावर प्रतिक्रिया

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. या आंदोलनाने गांधींना पुन्हा जिवंत केले आहे. शेतकऱ्यांच्या रक्तांत गांधींचा पुन्हा जन्म झाल्यासारखे वाटत आहे, असे ते म्हणाले.

दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह
author img

By

Published : Dec 9, 2020, 7:15 PM IST

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमांवरील शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवताना दिसून येत आहेत. या आंदोलनाने गांधींना पुन्हा जिवंत केले आहे. शेतकऱ्यांच्या रक्तांत गांधींचा पुन्हा जन्म झाल्यासारखे वाटत आहे. गांधीचा सत्याग्रह स्वीकारून शेतकऱ्यांनी देशवासियांमध्ये लढण्याची उर्मी निर्माण केली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले.

कृषी कायद्यांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद काही भूमिका घेतील, अशी आशा नसल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले. 24 राजकीय पक्षांनी एनडीएमध्ये असलेल्या मात्र, शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा केली पाहिजे. नितीशजींनी मोदीजींवर दबाव वाढवावा, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट -

काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. कृषी कायदे रद्द करण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.