ETV Bharat / bharat

गोव्यात योग्य सरकार बनविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची - आनंद शर्मा

भाजपने काँग्रेसचे दोन आमदार फोडले, तर देवाने त्यांच्या दोघांना बोलावून घेत समतोल साधला, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या सभेत केले.

गोव्यात योग्य सरकार बनविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची -आनंद शर्मा
author img

By

Published : Apr 21, 2019, 2:21 PM IST

पणजी - विचारशक्ती, विचार आणि खरेपणा भाजपजवळ नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काँग्रेस, राहुल गांधी यांना देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते शहिदांच्या बलिदानावर मते मागून त्यांचा अपमान करत आहेत, असा आरोप राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज मोरजी येथे केला. काँग्रेसचे विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार बाबी बागकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

बागकर हे मोरजीचे रहिवासी असल्याने आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष होते. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, नीळकंठ हळर्णकर, माजी शिक्षणमंत्री संगीत परब, रमाकांत खलप, काँग्रेसचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, मांद्रे विधानसभा उमेदवार बाबी बागकर, वैशाली शेटगांवकर, उमेश तळावणेकर, ट्रोजन डिमेलो आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, दिल्लीतून भाजप सरकारचा निरोप निश्चित आहे. परंतु, गोव्यात योग्य सरकार बनविण्यासाठीदेखील ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. ज्यामुळे येथील समस्या सोडविणे शक्य होणार आहे. कारण येथील सरकार मोदी-शाह यांनी जनादेश झुगारून बनवले आहे.

काँग्रेससने ७० वर्षात काहीच केले नाही, असे सांगत सुटतात. परंतु, मोदींकडून काँग्रेसला प्रमाणपत्र नको आहे. असे ते म्हणाले. आम्ही चांद्रयान, मंगळयान बनवले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या सैन्याला पाणी पाजत बांगलादेशची निर्मिती केली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या पाठीवर, अशा प्रकारे विजय मिळविणारा भारत हा एकमेव देश आहे. मागील ५ वर्षांत देशावर ५०० हून अधिक वेळा दहशतवादी हल्ले झाले. मोदी- शहांच्या चुकीच्या निर्णयामुळे २ टक्क्यांनी जीडीपी कमी झाला. तसेच ३ लाख कोटी रूपये कायमस्वरूपी नष्ट झाले. त्यामुळे विचारपूर्वक मतदान केले पाहिजे.

तत्पूर्वी बोलताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मांद्रे मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक म्हणजे काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता विरूद्ध व भाजपचा 'बिझनेसमन' अशी असल्याचे ते म्हणाले. मांद्रे मतदारसंघाच्या इतिहासात सोपटे यांनी पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीत्व अर्ध्यावर सोडले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवत इतिहास घडविण्याची गरज मांद्रे मतदारसंघाला आहे. भाजपने काँग्रेसचे दोन आमदार फोडले. तर देवाने त्यांच्या दोघांना बोलावून घेत समतोल साधला, असे वक्तव्यही त्यांनी केले.

राममंदिरासाठी जमविलेल्या विटा अनमोड घाटात - गिरीश चोडणकर

उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना चोडणकर म्हणाले, संपूर्ण गोव्याचे लक्ष मांद्रे, शिरोडा मतदारसंघाकडे आहे. गद्दारांना धडा शिकवून गोव्याचे राजकारण. शुद्ध करण्याची संधी या मतदारसंघातील लोकांना आहे. भाजपने राममंदिर बनविण्यासाठी गावोगावी फिरून विटा जमा केल्या होत्या. परंतु, या विटा अयोध्येत न नेता ट्रकचे भाडे परवडणार नसल्याने गोवा-कर्नाटक सीमेवरील अनमोड घाटावर टाकण्यात आल्या आहेत. ज्या आजही तेथे पाहता येथील. त्यामुळे देवाला फसविणाऱ्या या लोकांपासून सावध रहा, असे ते म्हणाले. यावेळी आलेक्स रेजिनाल्ड, ट्रोजन डिमेलो यांनी मार्गदर्शन केले.

Intro:पणजी : विचारशक्ती, विचार आणि खरेपणा भाजपजवळ नाही. त्यामुळे यांच्याकडून काँग्रेस, राहुल गांधी यांना देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच शहिदांच्या बलिदानावर मते मागून त्यांचा अपमान करत आहेत, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज मोरजी येथे केले. काँग्रेसचे विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार बाबी बागकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

Body:बागकर हे मोरजीचे रहिवासी असल्याने आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष होते. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, नीळकंठ हळर्णकर, माजी शिक्षणमंत्री संगीत परब, रमाकांत खलप, काँग्रेसचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, मांद्रे विधानसभा उमेदवार बाबी बागकर, वैशाली शेटगांवकर, उमेश तळावणेकर, ट्रोजन डिमेलो आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शर्मा म्हणाले, दिल्लीतून भाजप सरकारचा निरोप निश्चित आहे. परंतु, गोव्यात योग्य सरकार बनविण्यासाठी देखील ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. ज्यामुळे येथील समस्या सोडविणे शक्य होणार आहे. कारण इथले सरकार हे मोदी- वहा यांनी जनादेश झुगारुन बनवले आहे.
काँग्रेससने ७० वर्षात काहीच केले नाही असे सांगत सुटतात. परंतु, मोदींकडूध काँग्रेसला प्रमाणपत्र नको आहे, असे सांगून शर्मा म्हणाले, आम्ही चांद्रयान , मंगळयान बववले. तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या सैन्याला पाणीपाजत बांगलादेशची निर्यिती केली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या पाठीवर अशा प्रकारे विजय मित्रविणारा भारत हा एकमेव देश आहे. मागील पाच वर्षात देशावर पाचशेहून अधिक वेळा दहशतवादी हल्ले झाले. मोदी- शहांच्या चुकीच्या निर्णयामुळे २ टक्यांनी जीडीपी कमी झाला. तसेच ३ लाख कोटी रूपये कायमस्वरूपी नष्ट झाले. त्यामुळे विचारपूर्वक मतदान केले पाहिजे.
तत्पूर्वी बोलताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करतात म्हणाले, मांद्रे मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक म्हणजे काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता विरूद्ध व भाजपचा 'बिझनेसमन' अशी आहे. मांद्रे मतदारसंघाच्या इतिहासात अर्ध्यावर लोकप्रतिनिधीत्व सोपटे यांनी पहिल्यांदाच सोडले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवत इतिहास घडविण्याची मांद्रे मतदारसंघाला आहे. भाजपने काँग्रेसचे दोन आमदार फोडले. तर देवाने त्यांच्या दोघांना बोलावून घेत समतोल साधला.
राममंदिरासाठी जमविलेल्या विटा अनमोड घाटात : गिरीश चोडणकर
उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना चोडणकर म्हणाले, संपूर्ण गोव्याचे लक्ष मांद्रे, शिरोडा मतदारसंघाकडे आहे. गद्दारांना धडा शिकवून गोव्याचे राजकारण. शुद्ध करण्याची संधी या मतदारसंघातील लोकांना संधी आहे. भाजपने राममंदिर बनविण्यासाठी गावोगावी फिरून विटा जमा केल्रा होत्या. परंतु, या विटा अयोध्येत न नेता ट्रकचे भाडे परवडणार नसल्याने गोवा-कर्नाटक सीमेवरील अनमोड घाटावर टाकण्यात आल्या आहेत. ज्या आजही तेथे पाहता येथील. त्यामुळे देवाला फसविणाऱ्या या लोकांपासून सावध रहा.
यावेळी आलेक्स रेजिनाल्ड, ट्रोजन डिमेलो यांनी मार्गदर्शन केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.