नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. द्वेष आणि हिंसा पसरवल्यामुळे देशामध्ये चांगले दिवस येणार नाहीत, असे दिग्विजय सिंह यांनी टि्वट करून म्हटले आहे.
'मला मुस्लीम समर्थक म्हटले जाते. मात्र, ना मी मुस्लीम समर्थक आहे, ना हिंदू समर्थक आहे. मी मानवतेचे समर्थन करणारा व्यक्ती आहे. प्रत्येक धर्माने मानवतेचा संदेश दिला असून हीच आमच्या सनातन धर्माची शिकवण आहे. जो संपूर्ण विश्वाला आपले कुटुंब मानतो. मोदी आणि शाहजींच्यै द्वेष आणि हिंसाचारामुळे देशात कधीच चांगले दिवस येणार नाहीत', या आशयाचे टि्वट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.
दिग्विजय सिंह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध केल्याने त्यांच्यावर भाजपकडून मुस्लीम समर्थक असल्याची टीका केली जाते. सिंह यांनी सीएए कायद्यावरून मोदी सरकारवर टीका केली होती. सीएए केवळ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी लागू करण्यात आला आहे, असे मत सिंह यांनी व्यक्त केले होते.