दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकानुसार गैरमुस्लिम लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्याचा प्रस्ताव आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील ईसान्य भारत लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी विधेयकाचा विरोध करावा असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
राजकयी अपरिहार्यतेसाठी विधेयकाला समर्थन करु नये. ईशान्य भारताच्या बाजुने उभे राहा, असे आवाहन काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी केले. काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हे विधेयक आज लोकभेत मांडले जाईल. धर्माच्या आधारे हे विधेयक भेदभाव करते. तसेच, ईशान्य भारतीयांच्या हीतसंबंधांना बाधा पोहोचवणारे असल्यांचे काँग्रेससह विरोधकांचे मत आहे.
हेही वाचा - गृहमंत्री अमित शाह आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार
काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक काल (रविवार) दिल्लीत पार पडली. या बैठकीत सोनिया गांधींसह मनमोहन सिंह, अधीर रंजन चौधरी, के. सुरेश, गौरव गोगोई, जयराम रमेश, ए.के. अँटनी, अहमद पटेल आदी उपस्थित होते. या विधेयकाच्या विरोधात इतर राजकीय पक्षांना कशाप्रकारे सामावून घेण्यात येईल याची चर्चा यात करण्यात आली.
हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर; आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. धर्मनिरपेक्षता, परंपरा, संस्कृतीला धक्का पोहोचवणारे हे विधेयक असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभेत सरकारकडे बहुमत असल्यामुळे हे बील पास होण्यास कोणतीही अडचण नाही. परंतु, राज्यसभेत याला विरोध होऊ शकतो.