ETV Bharat / bharat

'काँग्रेस-आरजेडी-डाव्यांच्या आघाडीमुळे बिहारमध्ये नक्षलवाद पुन्हा डोकं वर काढेल'

author img

By

Published : Oct 21, 2020, 7:20 PM IST

जमुई, भोजपूर आणि पाटणा जिल्ह्यात योगी आदित्यनाथ यांनी आज (बुधवार) प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस, आरजेडी आणि अतिडावे सीपीआय (अल्ट्रा लेफ्ट सीपीआय) यांची आघाडी दुर्देवी असून त्यामुळे बिहारमध्ये नक्षलवाद पुन्हा डोके वर काढेल, अशी भीती योगी यांनी व्यक्त केली.

file pic
योगी आदित्यनाथ

पाटणा - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहार दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेस, आरजेडी आणि अतिडावे सीपीआय (अल्ट्रा लेफ्ट सीपीआय) यांची आघाडी दुर्देवी असून त्यामुळे बिहारमध्ये नक्षलवाद पुन्हा डोके वर काढेल, अशी भीती योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित करताना व्यक्त केली.

जमुई, भोजपूर आणि पाटणा जिल्ह्यात योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतल्या. आज (बुधवार) त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी जातीय राजकारणावर देखील भाष्य केले. विशिष्ट मतदारसंघात ज्या जातीचे बहुमत आहे, तेथे त्याच जातीच्या नेत्याचे वर्चस्व होते, असे ते म्हणाले.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. यासोबतच नागरिकत्व सुधारणा कायदा करून केंद्राने अत्याचारीत अल्पसंख्यकांना दिलासा दिला, अयोध्येत राम मंदिर बांधल्याचा उल्लेख योगी आदित्यनाथ यांनी भाषणात केला. या सर्व गोष्टींमुळे देशात आनंद पसरला आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान घाबरलेले दिसत आहेत. त्यासोबतच राहुल गांधी आणि ओवेसींसारखे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांची मानसिकता समजून घ्या आणि अशा नेत्यांपासून सावध रहा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

योगींनी सभेत भारत 'माता की जय' आणि 'जय श्रीराम' च्या घोषणा दिल्या. बिहार ही सीतामातेची भूमी असल्याची आठवण त्यांनी नागरिकांना करुन दिली. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी बिहारच्या खेडेगावातील एकतरी प्रतिनिधी कार्यक्रमात पाहिजे होता. मात्र, कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. मंदिर तयार झाल्यानंतर बिहारचे भाविक अयोध्येत आलेले मला पाहायला आवडेल, असे योगी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.