जयपुर - राजस्थानमध्ये असलेले काँग्रेस आमदार हे मुख्यमंत्री निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही याठिकाणी पोहोचले आहेत.
काँग्रेस नेते रघु शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यादेखील जयपूरमध्ये आहेत. त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्यासाठी हे सर्व नेते मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी एकत्र जमणार आहेत.
मात्र, ज्याप्रकारे या सर्व आमदारांच्या चेहऱ्यावर विजयी हास्यमुद्रा आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला अनुकूल एखादा मोठा निर्णय घेतला गेला असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले नसले, तरी शिवसेना सत्तास्थापनेच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे कदाचित काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झाला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हेही वाचा : 'बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाचा भाजपने गैरफायदा घेतला; त्यामुळे उद्धव या पवित्र्यात'