ETV Bharat / bharat

प्रियांका गांधींना सरकारी घर सोडण्याचे आदेश; एक ऑगस्टपर्यंत मुदत

दिल्लीच्या लोधी रोडवर हे निवासस्थान आहे. हा भाग शहराच्या संरक्षित भागांपैकी एक आहे. मात्र, प्रियांका गांधींसह गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) काढून घेण्यात आली असल्यामुळे, त्यांना हे निवासस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत..

author img

By

Published : Jul 1, 2020, 8:50 PM IST

Cong leader Priyanka Gandhi Vadra asked to vacate Government Bungalow By August 1
प्रियांका गांधींना सरकारी घर सोडण्याचे आदेश; एक ऑगस्टपर्यंत मुदत..

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये असलेले हे सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी त्यांना एक ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रियांका गांधींना पत्र लिहीत याबाबत आदेश दिले आहेत. दिल्लीच्या लोधी रोडवर हे निवासस्थान आहे. हा भाग शहराच्या संरक्षित भागांपैकी एक आहे. मात्र, प्रियांका गांधींसह गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) काढून घेण्यात आली असल्यामुळे, त्यांना हे निवासस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना असलेली एसपीजी सुरक्षा काढून, त्याजागी सीआरपीएफची झेड-प्लस सुरक्षा पुरवली होती. झेड-प्लस सुरक्षेमध्ये याठिकाणी राहण्याचा अधिकार नसल्यामुळे, त्यांना आता हे निवासस्थान सोडावे लागणार आहे.

हेही वाचा : केरळमधील तब्बल ५२ सीआयएसएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.