ETV Bharat / bharat

काँग्रेसने एमपीच्या शेतकरी, महिला आणि तरुणांचा विश्वासघात केला; सिंधियांची जोरदार टीका

कन्यादान योजनेंतर्गत राज्य सरकार लोकांना २५ हजार रुपये देत आहे. काँग्रेसने ५१ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्यामुळे अनेक लोकांनी लग्ने केली. मात्र, घोषणेच्या वर्षभरानंतरही लाभार्थींना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अशा प्रकारे काँग्रेसने राज्यातील माय-लेकींचाही विश्वासघात केला, असे सिंधिया म्हणाले.

author img

By

Published : Sep 27, 2020, 1:22 PM IST

Cong has betrayed trust of farmers, women, youth of MP: Jyotiraditya Scindia
काँग्रेसने एमपीच्या शेतकरी, महिला आणि तरुणांचा विश्वासघात केला; सिंधियांची जोरदार टीका

भोपाळ : काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधियांना विश्वासघातकी म्हटले होते. यावर काँग्रेसने तर, मध्य प्रदेशचे शेतकरी, महिला आणि तरुणांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत सिंधियांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. ते शनिवारी इंदूरमधील एका सभेत बोलत होते.

"आज ते (काँग्रेस) म्हणत आहेत की, ज्योतिरादित्य सिंधिया हा एक विश्वासघातकी आहे. मी त्यांना एवढेच विचारेन की, दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची त्यांनी जी घोषणा केली होती त्याचे काय झाले? काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ते केवळ विश्वासघातकी नाही, तर देशद्रोही सुद्धा आहेत" असेही सिंधिया यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहान सरकारच्या कामाचे कौतुकही केले. कन्यादान योजनेंतर्गत राज्य सरकार लोकांना २५ हजार रुपये देत आहे. काँग्रेसने ५१ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्यामुळे अनेक लोकांनी लग्ने केली. मात्र, घोषणेच्या वर्षभरानंतरही लाभार्थींना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अशा प्रकारे काँग्रेसने राज्यातील माय-लेकींचाही विश्वासघात केला, असे सिंधिया म्हणाले.

त्याचप्रमाणे काँग्रेसने बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये भत्ता देण्याचेही आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? त्यांनी तरुणांचाही विश्वासघातच केला, असे म्हणत सिंधियांनी काँग्रेसवर टीका केली.

सिंधिया हे भाजपा उमेदवार तुलसी सिलावत यांच्या प्रचारसभेत बोलत होते. मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत.

हेही वाचा : मन की बात : पंतप्रधानांनी गायले कृषी विधेयकांचे गुणगाण; सांगितले गोष्टी सांगण्याचे महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.